आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mystery: पत्नी स्त्री आहे का याची मेडिकल टेस्ट करायची होती पतीला, तक्रारीच्या 2 दिवसांनीच आढळला मृतदेह PCS Officer Accused Of Killing PCS Husband In Uttar Pradesh

Mystery: पत्नी स्त्री आहे का याची मेडिकल टेस्ट करायची होती पतीला, तक्रारीच्या 2 दिवसांनीच आढळला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - यूपीच्या शाहजहांपूरमध्ये कार्यरत असलेला पीसीएस अधिकारी पोलिसांकडे तक्रार नोंदवतो की, त्याच्या जिवाला धोका आहे, त्याची पत्नीच त्याच्या जिवावर उठली आहे. तक्रार दाखल झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी बातमी मिळते की, पीसीएस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. मागच्या दोन वर्षांपासून रंजीत सोनकर यांचा मृत्यू मिस्ट्री बनलेला आहे. ही आत्महत्या होती का मर्डर? 

 

पत्नीची मेडिकल टेस्ट करायची होती पतीला   
- शाहजहांपूर जिल्ह्यातील दिव्यांग कल्याण अधिकारी पदावर असलेले रंजित सोनकर यांचे फेब्रुवारी 2016 मध्ये अर्चना सोनकरशी लग्न झाले होते. अर्चनाही जिल्हा समाजकल्याण विभागात अधिकारी आहे.
- लग्नाच्या फक्त एका आठवड्यानंतरच दोघांमध्ये वादावादी सुरू झाली होती. वाद एवढा वाढला की, अर्चना पतीपासून वेगळी होऊन आपल्या सरकारी क्वार्टरमध्ये शिफ्ट झाली.
- अर्चनाचा पूर्वी घटस्फोट झालेला होता. रंजित सोनकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत लिहिले होते की, "तिच्यात महिलांसारखा एकही गुण नाही. मला तिची मेडिकल टेस्ट करायची आहे- ती खरेच स्त्री आहे की नाही. ती मला तिच्या भावांसह मिळून जिवे मारायचे म्हणते."
- रंजितने ही तक्रार मृत्यूच्या दोन दिवसआधी 19 एप्रिल 2016 रोजी दिली होती.

 

मोलकरीण घेऊन गेली होती रुग्णालयात
- 21 एप्रिल 2016 रोजी रंजित सोनकर आपल्या निवासस्थानी मृत आढळले होते. त्यांच्या घरी कामासाठी पोहोचलेल्या मोलकरणीने आधी त्यांना बेशुद्धावस्थेत पाहिले होते. तीच त्यांना घेऊन रुग्णालयात गेली होती.
- पोस्टमॉर्टमनुसार, रंजित यांचा मृत्यू विषामुळे झाला होता.
- पोलिसांनी त्यांच्या तक्रारीआधारे पत्नी अर्चना आणि तिच्या दोन भावांविरुद्ध भादंविचे कलम 302 आणि 228 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
- आरोपी अर्चनाचा एक भाऊ सेल्स टॅक्स कमिशनर आणि दुसरा फौजदार आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...