आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडुत पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना, भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई/अगरतळा - त्रिपुरामध्ये 25 वर्षांची  डाव्यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर पुतळ्यांचे राजकारण सुरु झाले आहे. त्रिपुरा येथे मंगळवारी लेनिनचे दोन पुतळे पाडण्यात आले. दुसरीकडे तामिळनाडुमधील वेल्लोर येथे द्रविड आंदोलनाचे संस्थापक आणि समाजसुधारक ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या पुतळ्याचे विटंबन करण्यात आले आहे. पेरियार यांच्या पुतळ्याचा चष्मा आणि नाक तोडण्यात आले आहे. याविरोधात कोइंबतूर येथे भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद तीन जणांचे चेहरे कैद झाले आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. 

 

भाजप नेत्याची फेसबुक पोस्ट 
- पेरीयार रामास्वामी यांच्या पुतळ्याचे विटंबन होण्यापूर्वी भाजप नेते एच. राजा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा पाडण्यात आला, उद्या तामिळनाडूत रामासामी पेरिया यांचा पुतळा हटवला जाईल. 
- त्रिपुरानंतर तामिळनाडुमध्ये पुतळ्यांचे राजकारण सुरु झाले आहे. भाजप नेत्याच्या फेसबुक पोस्ट नंतर भाजपच्या युवक आघाडीचे उपाध्यक्ष एस.जी.सूर्या यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. 
ते म्हणाले, 'भाजपने त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा यशस्वीपणे पाडला. आता तामिळनाडुमध्ये ईव्ही रामासामींचा पुतळा पडण्याची वाट पाहणे कठीण झाले आहे.'

- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्लोर येथील तिरुपत्तूर येथे रात्री साधारण 9.15 वाजता नशेत असलेल्या दोघा जणांनी पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यांना तत्काळ अटक करण्यात आले आहे. त्यातील एक आरोपी मुथुरमन हा भाजपचा सदस्य आहे. तर त्याच्यासोबतचा फ्रान्सिस हा सीपीएमशी संबंधीत आहे. 

 

24 तासांत लेनिनचे दोन पुतळे पाडले 
त्रिपुराच्या बेलोनियामध्ये सोमवारी रशियन क्रांतीचे नायक व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा पाडल्यानंतर हिंसाचार पेटला आहे. समर्थक व विरोधकांत तीन दिवसांत 770 चकमकी झडल्या असून त्यात एक हजारपेक्षा जास्त जण जखमी झाले. मंगळवारीही सबरूम गावात लेनिनचा आणखी एक पुतळा पाडण्यात आला. यावरून भाजप अाणि माकपकडून आरोप- प्रत्याराेप हाेत आहेत. 


लेनिन अतिरेकी होता. भारतात त्याचा पुतळा कशाला? डाव्यांना इतकीच गरज असेल तर त्यांनी मुख्यालयात पुतळा बसवून त्याची पूजा करावी.

- सुब्रमण्यम स्वामी, राज्यसभा खासदार, भाजप 

बातम्या आणखी आहेत...