आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Person Found Masturbating On Railway Platform Woman Made That Incident Live On Facebook

लज्जास्पद: रेल्वेस्टेशनवर खुलेआम मास्टरबेट करत होता विकृत, महिलेने केले फेसबुकवर लाइव्ह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये एका रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना समोर आली. येथे एक विकृत प्लॅटफॉर्मवर खुलेआम मास्टरबेट करत होता. यादरम्यान रेल्वेत बसलेल्या एका महिलेने या विकृताचे चाळे फेसबुक लाइव्ह केले. सूत्रांनुसार, बंडेल स्टेशनवर उभी असलेली रेल्वे निघणारच होती, तितक्यात हा विकृत महिलांच्या डब्याच्या ठीक समोर उभा राहून मास्टरबेट करू लागला. तथापि, हा प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत हा विकृत तेथून पळून गेलेला होता. घटना रविवारी दुपारी 1 वाजेदरम्यान घडली. एक लोकल ट्रेन बंडेल स्टेशनवर पोहोचली तेव्हा एक पन्नाशीचा विकृत महिलांकडे पाहून घाणेरडे इशारे करू लागला. रेल्वे निघणारच होती, म्हणून कुणीही याचा विरोध केला नाही. परंतु एका 20 वर्षीय महिलेने या विकृताचे चाळे थेट फेसबुक लाइव्ह करून प्रशासनाला दखल घ्यायला भाग पाडले. तिने आपला मोबाइल काढला आणि ही पूर्ण घटना फेसबुकवर लाइव्ह करून टाकली.

 

महिलाच्या धाडसामुळे पोलिसांना घ्यावी लागली दखल

फेसबुकवर लाइव्ह सुरू असताना महिला म्हणत होती की, 'सध्याचा जमाना पुराव्यांचा आहे, प्रत्येकालाच पुरावे पाहिजे असतात. मी ही घटना फेसबुकवर लाइव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे.' महिलेच्या या धाडसी पावलामुळे त्या डब्यात बसलेल्या इतर महिलांनाही धीर मिळाला आणि त्यांनी त्या विकृताच्या कृत्याविरुद्ध आवाज उठवला. यानंतर काही महिलांनी रेल्वे स्टाफला घटनेची माहिती दिली. घटनेचे फेसबुक लाइव्ह करणाऱ्या महिलेने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हा विकृत खुलेआम घाणेरडे चाळे करत होता. विशेष म्हणजे तो रेल्वे पोलिसांच्या कार्यालयाबाहेर उभा राहून हे सर्व करत होता. परंतु मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केल्यावर त्यांनी हालचाल केली, परंतु तोपर्यंत विकृत तेथून पळून गेला होता.

 

काय म्हणतात रेल्वे पोलिस?
बंडेल स्टेशनचे रेल्वे पोलिस अधिकारी म्हणाले की, तो व्यक्ती एका रेल्वेत बसून पळून गेला. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे दिसते. आम्ही या घटनेची माहिती बर्दवान रेल्वे पोलिसांना दिली आहे. परंतु अद्याप या व्यक्तीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. तथापि, यापूर्वीही कोलकात्यात एका बसमध्ये अशाच पद्धतीने एक विकृत मास्टरबेट करताना पकडण्यात आला होता. तेव्हाही एका महिलेनेच फेसबुकच्या माध्यमातून या घटनेचा वाचा फोडली होती. कोलकाता पोलिसांच्या फेसबुक पेजवर संपर्क केल्यावर त्या विकृताला जेरबंद करण्यात आले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...      

 

बातम्या आणखी आहेत...