आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Peugeot Metropolis 400 Scooter Launched Soon In India भारतात येत आहे 400cc अन् 3 चाकांची ही स्कूटर

भारतात येत आहे 400cc अन् 3 चाकांची ही स्कूटर, एवढी असेल किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क - फ्रान्सची प्रसिद्ध ऑटोमोबाइल कंपनी Peugeot लवकरच भारतात आपली सर्वात हायटेक स्कूटर लाँच करणार आहे. या स्कूटरचे मॉडेल नंबर Peugeot Metropolis 400 असे आहे. या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे यात 3 चाके देण्यात आलेली आहेत. यामुळे ज्यांना स्कूटर चालवता येत नाही, त्यांनाही ही सहजपणे बॅलन्स करता येईल. ही फ्रेंच कंपनी यासाठी महिंद्रा 2 व्हीलरसोबत काम करत आहे.

 

# 400cc ची दमदार स्कूटर
Peugeot Metropolis 400 ला इतर देशांमध्ये यापूर्वीच लाँच करण्यात आलेले आहे. या स्कूटरमध्ये 400cc चे 4-स्ट्रोक लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. याची पॉवर 35.6bhp @ 7000rpm आणि मॅक्सिमम टॉर्क 28.1lb ft @ 5250rpm आहे. स्कूटरमध्ये ऑटोमैटिक गिअर देण्यात आलेले आहेत. स्कूटरच्या तिन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहेत. यात 13.5 लिटरचे फ्यूएल टँक आहे. 

 

# एवढी असेल किंमत
भारतात या दमदार स्कूटरची किंमत 2.5 लाख रुपयांच्या जवळपास असू शकते. तथापि, जेव्हा ही लाँच केली जाईल तेव्हाच याची खरी किंमत कळू शकेल. किमतीत मोठी तफावतही पाहायला मिळू शकते. स्कूटरमध्ये सेमी डिजिटल मीटर देण्यात आले आहे. यात स्कूटरच्या मेंटेनन्सशी संबंधित इन्फॉर्मेशन राहील. याचे वजन तब्बल 258 किलोग्रॅम आहे.

 

# स्कूटरचे इतर फीचर्स
यात मेंटेनन्स फ्री बॅटरी देण्यात आली आहे. सीटची हाइट 780mm आहे. यात अॅनालॉग स्पीडोमीटर आणि टेकोमीटर मिळते. यासोबतच डिजिटल ट्रिप मीटरही आहे. या मीटरमध्ये टेम्परेचर, डिजिटल क्लॉक, डिजिटल फ्यूएल गेज, लो फ्यूएल गेज, लो फ्यूएल वॉर्निंग, सर्व्हिस रिमाइंडर, लो ऑइल इंडिकेटर, लो बॅटरी इंडिकेटर असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या ही स्कूटर चार कलर्समध्ये ब्लॅक, ग्रे, व्हाइट आणि रेड मध्ये आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Peugeot Metropolis 400 चे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...