Home | National | Other State | PM modi critize opposition in patna

अाम्ही जन-मन जोडणारे, तर ते दुफळी माजवणारे; माेदींचा विरोधकांवर निशाणा

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 11, 2018, 03:20 AM IST

चंपारण्य सत्याग्रहा’स मंगळवारी १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोतिहारीमध्ये आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

 • PM modi critize opposition in patna

  पाटणा - ‘चंपारण्य सत्याग्रहा’स मंगळवारी १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोतिहारीमध्ये आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “सत्याग्रहातून स्वच्छाग्रह’ अभियानाची घोषणा केली. मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत सांगितले की, संसदेसह ठिकठिकाणी सरकारच्या कामात अडथळे आणले जात आहेत. ते (विरोधक) लोकांमध्ये दुफळी माजवण्याचे काम करत आहेत. आता अटकवणे, लटकावणे आणि भरकटण्याचे काम चालणार नाही.

  आमच्या सरकारची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आता फाइल्स दाबल्या जात नाहीत. जे लोक हा बदल स्वीकार करत नाहीत, त्यांना अडचण येत आहे. कारण ते आता खोटे बोलू शकणार नाहीत. घाण नदीत जाऊ नये, यासाठी गंगा नदी किनाऱ्यावरील गावांंत शौचालये उभारली जात आहेत. देशात कचरा महोत्सव बनवण्याची आवश्यकता आहे.


  मोदी यांनी नितीश कुमार व सुशील मोदी यांचे कौतुक करताना म्हटले की, बिहारने गेल्या काही दिवसांत जे काम केले, त्यामुळे हुरूप आला आहे. स्वच्छतेची कक्षा ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेले बिहार देशातील एकमेव राज्य होते. बिहारने आठवड्यात ८.५० लाखांहून जास्त शौचालये बांधलीत.

  इतिहासाची पुनरावृत्ती होते; इथे कुणी कस्तुरबा, तर कोणी राजेंद्रबाबू
  मोदी भोजपुरीत भाषणाची सुरुवात करताना म्हणाले, आज आम्ही बापूंचे अभियान पुढे नेत आहोत. ज्या लोकांना वाटते, इतिहास पुनरावृत्ती करत नाही, ते इथे पाहू शकतात की, १०० वर्षांपूर्वीचा इतिहास आज आपल्यासमोर कसा अस्तित्वात आहे. मी स्वच्छता स्वयंसेवातील गांधीजींच्या अंशास प्रणाम करतो. या विशाल समूहात कोणी कस्तुरबा, कोणी राजकुमार शुक्ल, कोणी गोरखप्रसाद, कोणी हरिवंश राय, तर कोणी डॉ. राजेंद्र बाबू आहेत.

  मोदींनी शिष्टाचार मोडत केली अधिकाऱ्याची प्रशंसा
  मोदी यांनी भाषणादरम्यान शिष्टाचार मोडत स्वच्छता व पेयजल मंत्रालयाचे सचिव परमेश्वर जी. अय्यर यांचे कौतुक केले. प्रसारमाध्यमांना सांगितले की, अय्यर यांच्यावर कॅमेरा फिरवा. ते अशी व्यक्ती आहेत, जे अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आले. ते भारतात आले याचा आनंद आहे. मी त्यांना स्वच्छाग्रहाचे काम दिले आहे. ते स्वत: शौचालयाची स्वच्छता करतात.

  बिहारने गत १०० वर्षांमध्ये तीन आव्हानांवेळी देशास मार्ग दाखवला
  मोदी म्हणाले, गेल्या १०० वर्षांत भारताच्या तीन मोठ्या आव्हानांवेळी बिहारने देशाला मार्ग दाखवला. देश गुलाम होता तेव्हा बिहारने मोहनदास करमचंद गांधीजींना महात्मा व बापू बनवले. स्वातंत्र्यानंतर जेव्हा कोट्यवधी शेतकऱ्यांसमोर भूमिहीनतेचे संकट होते तेव्हा विनोबा भावेजींनी भूदान आंदोलन सुरू केले होते. तिसऱ्यांदा जेव्हा देशाच्या लोकशाहीवर संकट आले होते तेव्हा याच भूमीचे नायक बाबू जयप्रकाश नारायण उभे राहिले.

  ११८६ कोटींच्या ५ प्रकल्पांचे पंतप्रधानांकडून उद्घाटन

  मोदी यांनी ५ प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावर एकूण ११८६.०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये ११६४ कोटी रु. पाटण्यातील ४ योजनांवर खर्च होतील. यामुळे येथे ३८१.७ किमी लांबीच्या सांडपाण्याचे ३ नेटवर्क तयार होईल. मोतीझीलच्या साैंदर्यीकरणावर २१.९९ कोटी रुपये खर्च केले जातील.

Trending