आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ शिलान्यासाचे दगड लावून नाही, तर काम सुरु करणे गरजेचे - मोदींचा काँग्रेसवर हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पब्लिक सेक्टरमधील देशातील पहिला इन्टिग्रेटिड रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स. - Divya Marathi
पब्लिक सेक्टरमधील देशातील पहिला इन्टिग्रेटिड रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स.

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) बाडमेर येथील राजस्थान रिफायनरीच्या कामाची सुरुवात केली. यावेळी मोदींनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, फक्त शिलान्यासाचे दगड लावून काम भागत नाही तर प्रत्यक्षात काम सुरु होणे गरजेचे असते. 43 हजार कोटींचा हा प्रकल्प असून आजपर्यंतची राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यावेळी मंचावर राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. 

 

शिलान्यासाचे दगड लावून लोकांची दिशाभूल करता येणार नाही... 
- मोदी म्हणाले, शिलान्यासाचे दगड लावून लोकांची दिशाभूल करता येणार नाही. अधिकाऱ्यांनी जेव्हा मला प्रोजेक्टची माहिती दिली तेव्हाच मी त्यांना विचारले की हा प्रकल्प पूर्ण केव्हा होणार? 
- 2022 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्यांचा 75वा वर्धापनदिन साजरा करत असेल, तेव्हा आम्ही स्वातंत्र्यासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या चरणात नवा भारत अर्पण करु. 2002 मध्ये या रिफायनरीचे काम पूर्ण झालेले असेल. 

 

पेट्रोलियम मंत्रालय आणि राजस्थान सरकारचे अभिनंदन... 

- मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच केंद्रीय पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विभागाला आणि वसुंधरा राजे यांच्या राजस्थान सरकारला शुभेच्छा दिल्या.  
 - मोदी म्हणाले, 'बाडमेरच्या भूमीने महान अशा लोकांना जन्म दिला आहे. या धरतीला माझे नमन. स्वातंत्र्यसैनिक गुलाबचंद यांची ही भूमी आहे. त्यांनी महात्मा गांधींच्या आधी मीठाचा सत्याग्रह केला होता.'
 - मी येथून भैरोसिंह शेखावत यांचे स्मरण करतो, असे म्हणत मोदींनी जसवंत सिंह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी येथे उपस्थित प्रत्येकाने आपापल्या इष्टदेवतांना त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. जसवंतसिंह देखील बाडमेरचे सुपूत्र आहेत. 

 

 मी इस्त्रायलला जाणारा पहिला पंतप्रधान 
 - मोदी म्हणाले, 'आपल्या देशाचे दुर्देव आहे की आपण आपल्या बलिदानाची पंरपार विसरुन जातो.'
 - 'इस्त्रायलचे पंतप्रधान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. 14 वर्षानंतर असे प्रथमच झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर इस्त्रायलला जाणारा मी पहिला पंतप्रधान होतो.'
 - 'राजस्थानच्या माझ्या वीरांना याचा गर्व होईल की इस्त्रायलमध्ये एवढ्या सर्व कार्यक्रमांची व्यस्तता असताना मी हायफा शहरात गेलो होतो. तिथे हिल्या महायुद्धात हायफाला ज्या वीरांनी मुक्त केले त्यांचे नेतृत्व मेजर दलपतसिंह शेखावत यांनी केले होते. ही 100 वर्षे जुनी गोष्ट आहे.'
 - 'दिल्लीमध्ये एक तीन मूर्ती चौक आहे. येथे तीन वीरांच्या मूर्ती आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान भारतात आले तेव्हा आम्ही दोघे तिथे गेलो. तिथे दलपतसिंह यांची मूर्ती आहे. आता या चौकाचे नाव तीन मूर्ती हायफा चौक करण्यात आले आहे. यानिमित्ताने यावीरांचे आपण स्मरण करु.'
 - 'ही वीरांची धरती आहे. बलिदानाची एकही कथा अशी नसेल ज्यामधे बाडमेरचा उल्लेख नसेल. या धरतीला प्रणाम.'

 

काय आहे रिफायनरीचे वैशिष्ट्य 
 - राजस्थान रिफायनरी ही राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी (41,129 कोटींची) गुंतवणूक आहे. 
 - यामुळे राज्याचे 34 हजार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न होईल. 
- ही देशातील सर्वात आधुनिक रिपायनरी असेल. त्यासोबत पब्लिक सेक्टरमधील देशातील पहिला इंटिग्रेटिड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्पलॅक्स असेल. 
- यामुळे प्लास्टिक, फायबर, पेंट, रबर या सारखे अनेक सहाय्यक उद्योगांचा विकास होईल. 
- 2022-23 मध्ये ही रिफायनरी तयार होईल.  

बातम्या आणखी आहेत...