आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 कोटींच्या प्रोजेक्टला लागले 3500 कोटी; गेली 20 वर्षे यूपीचा विकास झालाच नाही -मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिर्झापूर - उत्तर प्रदेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिर्झापूर येथे बाणसागर कालवा प्रकल्पासह 100 औषध केंद्रांचे लोकार्पण केले. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भित्तीपत्रकाचे उद्गाटन केले. यावेळी मोदी म्हणाले, बाणसागर प्रकल्पाचा आराखडा 40 वर्षांपूर्वीच मांडण्यात आला होता. त्यावेळी या प्रकल्पाला 300 कोटी रुपये खर्च लागणार होते. परंतु, तसे झालेच नाही. आता याच प्रकल्पाला 3500 कोटी रुपये खर्च आला आहे. देशभर अजुनही असे प्रकल्प अधांतरी लटकले आहेत. 


योगी सरकारचे मोदींकडून तोंडभर कौतुक
पीएम मोदींनी उत्तर प्रदेश दौऱ्यात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सरकारचे तोंडभर कौतुक केले. ते म्हणाले, "जेव्हा योगींच्या नेतृत्वाखाली यूपीत सरकार स्थापित झाले तेव्हाच पूर्वांचल परिसरात विकासाची गती वाढली. त्याचे निकाल सुद्धा सर्वांना दिसायला लागले. गेल्या दोन वर्षांत मला येथील अनेक योजना आणि प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. पूर्वांचल एक्सप्रेसवे असो वा वाराणसीतील शेतकऱ्यांसाठी बांधलेले कार्गो सेंटर, या सगळ्याच गोष्टी येथे होणाऱ्या विकासाला प्रोत्साहन देतात. विकासाच्या याच कामांना पुढे नेण्यासाठी मी येथे आलो आहे.''

 

2 दशकांपासून विकास झालाच नाही -मोदी
पीएम मोदी म्हणाले, "बाणसागर प्रकल्पाने समस्त परिसरातील दीड लाख एकर भागात सिंचनाची व्यवस्था मिळणार आहे. या योजनेचा आराखडा 40 वर्षांपूर्वीच 1978 मध्ये तयार झाला होता. परंतु, यापूर्वीच्या सरकारांनी त्यावर लक्ष दिले नाही. त्यांना शेतकऱ्यांचीही चिंता नव्हती. 20 वर्षे तर फक्त कामाची सुरुवात करण्यातच गेले. यानंतर आलेल्या सरकारने फक्त आश्वासने दिली. 2014 मध्ये आपण मला संधी दिलात. आमच्या सरकारने अडकलेले अनेक प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू केले. त्यामध्येच बाणसागर प्रकल्पाचा देखील समावेश होता. गेल्या दीड वर्षांत योगींनी कामाला जी गती दिली त्याचेच हे परिणाम होते. ज्या लोकांनी आपल्यासाठी रडण्याचे ढोंग केले. त्यांना विचारा की इतकी वर्षे या योजना का अडकल्या होत्या. त्यांना हे प्रकल्प कधी दिसले नाहीत का?''

बातम्या आणखी आहेत...