आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Modi Slams Rahul Gandhi Over Muslim Women Rights And Triple Talak At Varanasi Visit

काँग्रेस हा मुस्लिम पुरुषांचा पक्ष, महिलांना स्थान कुठे? मोदींचा हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझमगड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन तलाकच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. निमित्त होते आझमगड येथे ३५४ किमी लांबीच्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेच्या कोनशिला अनावरणाचे. मात्र मोदींनी यानिमित्ताने हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना काँग्रेसला घेरले. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष काय केवळ मुस्लिम पुरुषांचाच पक्ष आहे का, मुस्लिम महिलांचा नाही?


मोदी म्हणाले, ‘मी एका वृत्तपत्रात वाचले - काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले आहे की, हा पक्ष मुस्लिमांचा पक्ष आहे. डॉ. मनमोहनसिंग यांनीही या देशातील स्रोतांवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते. तुमचा पक्ष मुस्लिमांचा आहे याबद्दल शुभेच्छा... मात्र, या पक्षात मुस्लिम महिलांना स्थान कुठे आहे?’ तीन तलाकच्या मुद्द्यावर या सर्व राजकीय पक्षांचे खरे रूप समोर आले असल्याचेही ते म्हणाले.

 

महिला कल्याणार्थ...
केंद्र महिलांच्या कल्याणार्थ धाडसी निर्णय घेत आहे. मात्र, तीन तलाकच्या मुद्द्याने काँग्रेसची अडचण झाली. काँग्रेस व इतर पक्ष महिलांनी कायम अडचणीत राहावे म्हणून प्रयत्न करत आहेत. विशेषत: तीन तलाकच्या मुद्द्यावर हे पक्ष तीन तलाक विधेयकाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.

 

मोदी खोटारडे...
राहुल गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव घेऊन मोदी खोटे बोलत आहेत. या माध्यमातून ते जनतेमध्ये द्वेषाचे विष पेरत असल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले. दरम्यान, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरही मोदींचे खोटे बोलणे अजूनही सुरूच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

आम्ही विधेयकाच्या बाजूने... : काँग्रेसचे प्रवक्ते प्रमोद तिवारी यांनी काँग्रेस पक्ष तीन तलाक विधेयकाच्या बाजूने असल्याचे सांगून विधेयक मांडण्यापूर्वी मोदीहे का बोलले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. आता मुद्दाम हा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला लक्ष्य केले जात असल्याचे तिवारी म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...