आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध, मर्सिडीझवर समान कर कसा लावणार? एकच जीएसटी करण्याची मागणी मोदींनी फेटाळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 30 जून 2017 रोजी मध्यरात्री संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करून जीएसटी लागू करण्यात आला होता. 

- गुड्स अँड सर्व्हीसेस टॅक्स 17 टॅक्स आणि 23 सेस रद्द करून लागू करण्यात आला होता. 

 

नवी दिल्ली- जीएसटीअंतर्गत कराचा दर एकच ठेवण्याची विराेधकांची मागणी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फेटाळली. जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, मर्सिडीझ कार व दूध यावर समान कर लावता येणार नाही. 


मोदी म्हणाले, जीएसटीअंतर्गत केवळ १८ टक्के एकच कराचा दर लागू करण्याची काँग्रेसची मागणी मान्य केली तर खाण्यापिण्याच्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या करात प्रचंड वाढ होईल. एकच स्लॅब लागू करणे अगदी सोयीचे ठरेल. परंतु, यात खाद्यपदार्थ करकक्षेच्या बाहेर राहू शकणार नाहीत. सध्या अशा पदार्थांवर शून्य ते ५ टक्के दराने कर आकारला जात आहे. जीएसटी अत्यंत किचकट असल्याचा आरोप फेटाळताना मोदी म्हणाले, ही करप्रणाली लागू केल्यानंतर एक वर्षाच्या आत अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या ७० टक्के वाढली आहे. 


...हा तर आरएसएस कर : पी. चिदंबरम 
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सध्या लागू असलेला जीएसटी म्हणजे आरएसएस कर असल्याची टीका केली आहे. या जीएसटीमुळे अद्याप अर्थव्यवस्थेवर कोणताही सकारात्मक परिणाम दिसला नसल्याचे ते म्हणाले. 

 

मोदींनी सांगितले GST चे फायदे 
मोदी यावेळी जीएसटीचे फायदे सांगताना म्हणाले, स्वातंत्र्यानंतरचा आतापर्यंतचा नवीन उद्योगांच्या नोंदणीचा आकडा 66 लाख आहे. पण जीएसटी लागू झाल्याच्या एका वर्षाच्या आत 48 लाख नव्या उद्योगांची नोंदणी झाली आहे. 350 कोटी बिल आणि 11 कोटी इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यात आले ाहेत. संपूर्ण देशातील चेकपोस्ट हटवले आहेत. आता राज्यांच्या सीमांवर वाहनांच्या रांगा लागत नाहीत. ट्रक ड्रायव्हर्सचा मौल्यवान वेळ वाचतोय. कारवाईचा वेग वाढला आहे आणि उत्पादनातही वाढ झाली आहे. जर जीएसटी इतके क्लिष्ट असते तर असे आकडे समोर आले असते का?

 

ट्वीटमध्येही केले कौतुक 
मोदींनी ट्वीट करूनही जीएसटीचे कौतुक केले. जीएसटी विकास, पारदर्शकता आणि सोपी पद्धत घेऊन आला आहे. व्यवसायासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्पादन वाढले, लहान आणि मध्यम उद्योगांना फायदा झाला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...