आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PNB Fraud Case, ED & CBI Raids Order To Keep Close Nirav Modi Stores In Overseas |

देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा; घाेटाळेबाज नीरव मोदी याचा 150 बोगस कंपन्यांशी संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली- ११,३९४ कोटी रुपयांच्या देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याचे सुमारे १५० बोगस कंपन्यांशी संबंध आहेत. सूत्रांनुसार, कंपनी व्यवहारविषयक मंत्रालय याची कसून चौकशी करत आहे. दरम्यान, हा घोटाळा १७,६०० कोटींहून मोठा असू शकतो, अशी शंका प्राप्तिकर विभागाने व्यक्त केली आहे. विभागाच्या एका अंतर्गत दस्तऐवजानुसार, मार्च २०१७ पर्यंत बँका नीरव तसेच त्याचा मामा मेहुल चौकसी यांच्या कंपन्यांना १७,६३२ कोटी रुपयांची हमी आणि कर्ज देऊन मोकळ्या झाल्या होत्या. या स्थितीत बँकांचे झालेले नुकसान आतापर्यंत समोर येत असलेल्या आकड्यांंपेक्षा कितीतरी अधिक असू शकते.


दरम्यान, नीरव-मेहुल यांच्या कंपन्यांना बोगस एलओयू  देणारे पीएनबीचे माजी उपव्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी व एक खिडकी विभागाचा अधिकारी मनोज खरात  तसेच नीरवचा अॉथोराइज्ड सिग्नेटरी हेमंत बट याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांनाही १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

 

> घोटाळा १७,६०० कोटींहून मोठा असल्याची प्राप्तिकर विभागाला शंका; 
घोटाळ्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

 

ईडीचे २१ ठिकाणी छापे, २५ कोटींचे हिरे आणि दागिने जप्त
शनिवारी तिसऱ्या दिवशीही ईडीने नीरवच्या २१ ठिकाणी छापे मारले. २५ कोटींचे हिरे, दागिने आणि ऐवज जप्त केला आहे. आतापर्यंत ५,६७४ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. जप्त वस्तूंची किंमत शोरूम/स्टोअरच्या स्टॉक व्हॅल्यूवर ठरवली आहे. कंपनी या किमतीवर खरेदी दाखवत असते. 

 

सीव्हीसीने बोलावले पीएनबी, वित्त मंत्रालयाचे अधिकारी
केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) वित्त मंत्रालय, रिझर्व्ह बँक आणि पीएनबीच्या अधिकाऱ्यांना बोलावले अाहे. सूत्रांनुसार, १९ तारखेला पेशी आहे. ऑडिटमध्ये इतके दिवस घोटाळा का समजला नाही, हे आयोगाला जाणून घ्यायचे अाहे. खोट्या एलओयूचा घोटाळा २०११ पासून सुरू होता.

 

यूपीए V/S एनडीए 

पीएनबी गैरव्यवहारात पंतप्रधान कार्यालयदेखील  सहभागी असल्याचा दावा काँग्रेसने केला. या प्रकरणात नरेंद्र मोदी शांत का बसले आहेत, असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. संरक्षण मिळाल्याशिवाय २२ हजार कोटींचा घोटाळा होऊच शकत नाही. बँकांवर लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी पीएम काय करत आहेत याची माहिती द्यावी, असे ते म्हणाले.

 

भाजपकडून प्रत्युत्तर :  सिंघवी यांच्या पत्नीच्या कंपनीने नीरवला भाडेतत्त्वावर इमारत दिली
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सप्टेंबर २०१३ मध्ये गीतांजलीच्या एका व्यावसायिक कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी झाले होते. नीरवची कंपनी फायरस्टार डायमंड इंटरनॅशनलला अद्वैत होल्डिंग नावाच्या कंपनीने लोअर परेलमध्ये इमारत भाडेतत्त्वावर दिली होती. काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्या पत्नी अनिता या अद्वैत होल्डिंग कंपनीच्या संचालक आहेत. सिंघवींनी आरोप फेटाळत मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले.

 

 

अर्थ राज्यमंत्री म्हणाले : नीरवला शिक्षा करूच
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दावा केला की, नीरवचे प्रत्यार्पण करून त्याला शिक्षा होईल असा प्रयत्न सुरू आहे. अर्थ मंत्रालयाची पीएमओशी चर्चा सुरू असून पीएमओ जो निर्णय घेईल तो लागू केला जाईल.

 

गोकुळनाथ आणि मनोजवर कोणते आरोप? 
- चौकशीत समोर आले की मार्च 2010 मध्ये बँकेच्या फॉरेक्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारा उपमहाव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याने विंडो ऑपरेटर मनोज खरात याला हाताशी धरून नीरव मोदीच्य कंपनीच्या नावे बनावट पद्धतीने LoU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) दिले. 
- ही चालबाजी कोणाला कळु नये यासाठी बँकेच्या रेकॉर्डमध्ये याची नोंदही केली गेली नव्हती. 
- बनावट एलओयूच्या आधारे नीरव मोदीने अॅक्सिस बँक आणि अलहाबाद बँकेच्या विदेशातील शाखांमधून डॉलरमध्ये कर्ज घेतले. 

- या कर्जाचा वापर बँकेच्या NOSTRO अकाऊंट्सच्या फंडिंगसाठी केला गेला होता. या अकाऊंट्समधून फंड विदेशातील काही फर्मकडे पाठवण्यात आला. या फर्म नीरव मोदीशी संबंधीत होत्या. 
- शेट्टी गेल्यावर्षी मे मध्ये उपमहाव्यवस्थापक पदावरुन निवृत्त झाला आहे. शेट्टी मुंबईतील बोरिवली येथे राहातो. एफआयआरमध्ये हाच पत्ता नोंदवलेला आहे. 

 

काय आहे LoU?
- जुन्या काळात हुंडी दिल्या जात होती, त्याच पद्धतीने 'एलओयू'च्या माध्यमातून बँक ग्राहकाची गॅरंटी घेते. ग्राहकाला हे एलओयू देऊन तो दुसऱ्या ठिकाणाहून मोठी रक्कम घेऊ शकतो. 

 

NOSTRO अकाऊंट काय असते? 
- हे बँकेचे विदेशातील अकाऊंट असते. या केसमध्ये बँक पीएनबी होती. पीएनबीच्या NOSTRO अकाऊंटमध्ये बनावट एलओयूच्या आधारे अलाहाबाद आणि अॅक्सिस बँकेने परदेशी चलनात लोन दिले होते. 

बातम्या आणखी आहेत...