आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • देशाची सर्वात लहान स्वस्त पेट्रोल बाइक, मायलेज 70km चे, किंमत फक्त 20 हजार रुपये Pocket Bike 49cc India Smallest Petrol Bike

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाची सर्वात लहान-स्वस्त पेट्रोल बाइक, मायलेज 70km, किंमत फक्त 20 हजार रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन ऑटो मार्केटमध्ये अशा अनेक बाइक्स आहेत ज्यांची डिझाइन त्यांना अनोखे बनवते. म्हणजेच या दिसायला स्टायलिश असतात. तुम्ही आतापर्यंत होंडाची 'नवी' बाइक पाहिली असेल, परंतु ही त्यापेक्षा अनेकपट लहान आहे. म्हणायला ही लहान मुलांची बाइक आहे, परंतु हिचा वापर मोठेही सहजरीत्या करू शकतात. ही बाइक पेट्रोलने चालते आणि हिचे मायलेज 70 किमीपर्यंत आहे.


# 50ccचे पेट्रोल इंजिन
या बाइकची मॅन्युफॅक्चरिंग ऑटो कंपन्यांकडून होत नाही, तर ती चीनमध्ये तयार होऊन इंडियन मार्केटमध्ये विक्री केले जातात. यात 50ccचे 2-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याचे मॅक्सिमम पॉवर 2kw आणि मॅक्सिमम टॉर्क 700r आहे. या छोट्याशा बाइकची जास्तीत जास्त स्पीड 45 किलोमीटर प्रति तास आणि मायलेज 70km आहे.

 

# असे आहेत फीचर्स
या बाइकमध्ये दमदार अलॉय व्हीलसेाबतच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. ही बाइक 90 किलोग्रामपर्यँत वजन उचलू शकते. म्हणजेच एवढ्या वजनाची व्यक्ती ही बाइक सहजपणे चालवू शकते. याचे ग्राउंड क्लिअरन्स 18cm आहे. बाइकचे वजन 23 किलोग्रॅम आहे. याच्या सीटची हाइट 62 सेंटिमीटर आहे. बाइकमध्ये 1.5 लिटरची पेट्रोल टँक देण्यात आली आहे. याचे इलेक्ट्रिक आणि पुल स्टार्ट केले जाऊ शकते.

 

# एवढी आहे किंमत
या बाइकचे वेगवेगळे मॉडेल इंडियन मार्केटमध्ये आहेत. काहींवर BMWचा लोगोही असतो. यांची किंमत 20 हजार रुपयांपासून सुरू होते. दिल्लीत या बाइकचे मोठे मार्केट आहे. दुसरीकडे, ऑनलाइन मार्केटमध्ये इंडियामार्टवरून खरेदी करता येते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या बाइकचे आणखी काही फोटोज व ती खरेदी करण्याची लिंक... 

बातम्या आणखी आहेत...