आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुला-मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांना सारखीच कलमे; पॉक्साेत दुरुस्तीचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागलकाेट - मुलगा व मुलीवरील लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध समान कलमे लावण्यासाठी केंद्र सरकार पॉक्सो कायद्यात दुरुस्ती करणार आहे.  महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने सांगितले की, कुकर्म पीडित मुलांनाही न्याय मिळवून देण्यासाठी पॉक्सो कायद्यात दुरुस्ती करून तो लैंगिकदृष्ट्या समन्यायी केला जाईल.  १२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेचा अध्यादेश सरकारने आधीच जारी केलेला आहे. 


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २२ एप्रिलला पॉक्साे कायद्यात दुरुस्तीसह क्रिमिनल लाॅ (दुरुस्ती) अध्यादेश २०१८ वर स्वाक्षरी केली. मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, सरकारने लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पॉक्सो कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव दिला आहे. याबाबत महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या, कायद्यात भरपाईच्या नियमांत बदल करण्याबाबत एकमत झाले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही त्याची शिफारस केलेली आहे. 


मुलांवरील लैंगिक छळांकडे दुर्लक्ष
मनेका गांधी म्हणाल्या, मुलांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांकडे आजवर दुर्लक्षच झाले आहे. मंत्रालय या मुद्द्यावर एक सर्वेक्षण करणार आहे. बालपणी झालेल्या लैंगिक छळामुळे मुले आयुष्यभर मानसिक ओझ्याखाली जगतात. 

बातम्या आणखी आहेत...