आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विटा नाही या आहेत नोटा! कानपूरमध्ये NIA च्या छाप्यात सापडल्या 96 कोटींच्या जुन्या नोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथम दर्शनी हा फोटो पाहिल्यानंतर विटा ठेवल्या आहेत असे दिसते मात्र या नोटा आहेत. बंद झालेल्या जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा. - Divya Marathi
प्रथम दर्शनी हा फोटो पाहिल्यानंतर विटा ठेवल्या आहेत असे दिसते मात्र या नोटा आहेत. बंद झालेल्या जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा.

कानपूर -  नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजेन्सीने (NIA) मंगळवारी उशिरा रात्री टाकलेल्या छाप्यात एका घरातून चलनाबाहेर केलेल्या 90 कोटी रुपये मुल्याच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे. 

 

- याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव अशोक खत्री असल्याचे सांगितले जात आहे. अशोकने या जुन्या नोटा बदलून देण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की या नोटा बदलून देण्याच्या या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांचाही हात असण्याची शक्यता आहे. 
- कानपूरचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार मीणा म्हणाले, गुप्त सुचना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. येथे एका रुममध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या नोटांचा साठा सापडला. नोटांची मोजणी सकाळपर्यंत सुरु होती. 

 

कोणाकडे सापडले एवढे मोठे घबाड? 
- कानपूरचे बिल्डर आनंद खत्री यांच्या घरातून हा पैसा जप्त करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, खत्री यांच्या घरातून 96 कोटी रुपये जप्त करण्यात आले. ही रक्कम त्यांच्या घरातील दोन-तीन रुममध्ये ठेवण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...