आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआ बलात्कार: मुख्य आरोपी सांझी रामने यासाठी रचले होते चिमुकलीच्या हत्येचे षडयंत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांझी रामने पोलिसांना सांगितले की मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती त्याला 13 जानेवारीला मिळाली होती. (फाइल) - Divya Marathi
सांझी रामने पोलिसांना सांगितले की मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती त्याला 13 जानेवारीला मिळाली होती. (फाइल)

जम्मू - कठुआ प्रकरणातील नवा गौप्यस्फोट झाला आहे.  प्रकरणाच्या चौकशीत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनुसार, आरोपी सांझीरामने चौकशीत पोलिसांना सांगितले की, मुलीच्या अपहरणाच्या चार दिवसांनंतर त्याला बलात्काराची माहिती मिळाली होती.  बलात्कारात आपल्या मुलाचा सहभाग असल्याचे कळाल्यानंतर त्याने मुलीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. १० जानेवारीला मुलीच्या अपहरणानंतर त्याच दिवशी सर्वात आधी सांझीरामच्या अल्पवयीन पुतण्याने बलात्कार केला. 


तपास अधिकाऱ्यांनुसार, सांझीरामला या घटनेची माहिती १३ जानेवारीला कळाली. त्याने देवीस्थानमध्ये पूजेनंतर पुतण्याला प्रसाद घरी जाण्यास सांगितले होते. मात्र उशीर केल्याने त्याला मारझोड केली. पुतण्याला वाटले की सांझीरामला बलात्काराची कुणकुण लागली आहे. यामुळे त्याने स्वत:हून त्याची कबुली सांझीरामकडे दिली. या प्रकरणात आपल्या मुलाचे नाव आल्यानंतर सांझीरामने मुलीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. हे लोक मुलीला हीरानगर कालव्यात फेकणार होते. मात्र वाहन न मिळाल्याने पुन्हा तिला मंदिरात घेऊन आले.

 

एकही पुरावा मागे ठेवणार नव्हता सांझी राम 
- पोलिसांनी सांगितले, '13 आणि 14 जानेवारीच्या रात्री सांझी रामचा पुतण्या, विशाल आणि त्याचा मित्र परवेश कुमार हे मुलीला मंदिराच्या बाहेर घेऊन गेले. त्यानंतर तिथे स्पेशल पोलिस ऑफिसर दीपक खजूरियाही पोहोचला आणि मुलीची हत्या करण्यापूर्वी त्याने तिच्यासोबत दुष्कर्म केले.' 
- 'सांझी राम एकही पुरावा मागे ठेवू इच्छित नव्हता मात्र त्यांनी रचलेल्या षडयंत्रानुसार सर्वकाही झाले नाही.'
- चार्जशीटनुसार, आरोपी मुलीचा मृतदेह हीरानगरच्या कालव्या जवळ फेकणार होते. मात्र वेळेवर वाहन मिळेला नाही म्हणून ते मृतदेह परत मंदिरात घेऊन आले होते. 

7 जानेवारीपासून सुरु झाले षडयंत्र 
- पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी अपहरणाचा प्रयत्न 7 जानेवारीपासून सुरु केला होता. त्या दिवशी त्यांनी आंमली पदार्थ खरेदी केले होते. 

 

हे आहेत 8 आरोपी
1) मंदिराचा सेवादार सांझी राम, 
2) सांजी रामचा मुलगा विशाल, 
3) सांझी रामचा पुतण्या, 
4) पोलिस उपनिरीक्षक आनंद दत्ता, 
5) विशेष पोलिस अधिकारी दीपक खजूरिया 
6) विशेष पोलिस अधिकारी सुरेंद्र वर्मा, 
7) हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि 
8) स्थानिक नागरिक प्रवेश कुमार. 

 

8 वर्षांच्या चिमुकलीची गँगरेपनंतर हत्या 
- जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात 10 जानेवारी रोजी अल्पसंख्याक बकरवाल समाजाची एक 8 वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली होती. 
- तिला रासना गावातील एका मंदिरात डांबून ठेवले आणि तिच्यावर गँगरेप करण्यात आला होता. 
- त्यानंतर गळा चिरुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. एवढेच नाही तर दगडाने तिचे डोके ठेचण्यात आले होते. 17 जानेवारी रोजी तिचा मृतदेह सापडला होता.

बातम्या आणखी आहेत...