आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला, 25 जखमी, मोदींनी घेतली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथे सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान मंडपाचा एक भाग कोसळून अपघात झाला. या अपघातात सुमारे 22 जण गंभीर झाले असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमी भाजपचे कार्यकर्ते आहेत.

 

अपघातानंतर याठिकाणी तैनात असलेल्या एसपीजीच्या जवानांनी लगेचच मदतकार्य करत या सर्वांना बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांना मिदनापूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सभा संपवून लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी जखमींची विचारपूस केली. 

 

मोदी पोहोचले हॉस्पिटलमध्ये..

सभा सुरू असताना अचानक झालेल्या या अपघाताने गोंधळ सुरू झाला. त्यावेळी पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी भाषण थांबवून एसपीजी जवानांना मदत करण्यासाठी पाठवले. सभा संपल्यानंतर नरेंद्र मोदीही लगेचच हॉस्पिटलमध्ये जखमींना भेटण्यासाठी गेले. याठिकाणी जखमींची विचारपूस केल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांना धीर दिला. 

 

काय म्हणाले मोदी..

- मोदींच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या पोस्टरसाठी जागा मिळू नये म्हणून तृणमूलने सगळीकडे ममतांचे पोस्टर्स लावले होते. मोदींनी यावर चिमटा काढत म्हटले, त्यांनी माझे हात जोडून स्वागत केले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मोदींच्या सभेत कमी लोक यावे म्हणून तृणमूलने येथे सभाही आयोजित केली. 

- भाजपचा जनाधार पश्चिम बंगालमध्ये वाढल्याचे मोदी म्हणाले.  भाजप येथे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. राज्यात भाजपला विस्तावाच्या आणखी संधी आहेत. पोटनिवडणुकांत त्याची झलक मिळाल्याचेही मोदी म्हणाले. 

 

पुढे पाहा, अपघाताचे PHOTO

 

बातम्या आणखी आहेत...