आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • पतीच्या अवैध संबंधाला केला विरोध, म्हणून चिडून त्याने प्रेग्नंट पत्नीला जिवंत जाळले Pregnant Wife Burnt Alive By Husband In Bihar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीच्या अवैध संबंधाला केला विरोध, म्हणून चिडून त्याने प्रेग्नंट पत्नीला जिवंत जाळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थावे (पाटणा) - अवैध संबंधांचा विरोध केल्याने पतीने क्रौर्याचा कळस गाठत आपल्या गर्भवती पत्नीला जिवंत जाळले. ही घटना पाटण्याच्या थावे परिसरात घडली. बुधवारी संध्याकाळी जाफर अब्बास घरी पोहोचला तेव्हा पत्नी जूही परवीनने त्याच्या अवैध संबंधांचा विरोध केला. यामुळे चिडलेल्या जाफरने आधी तिला बेदम मारहाण केली आणि मग तिच्या अंगावर केरोसिन ओतून आग लावली. तिचे शरीर गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर घरातील सर्व घर सोडून फरार झाले.

- घटनेची माहिती मिळताच पोलिस पोहोचले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह हस्तगत केला. यानंतर तो पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
- घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले. घरात अनेक ठिकाणी केरोसिन सांडलेले होते.
- दोघांचे लग्न 10 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते.

- मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी आरोप केला की, जफरचे लग्नाआधीपासूनच आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीशी अवैध संबंध आहेत. याचा मृत विवाहिता विरोध करायची.
- पोलिस म्हणाले की, मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यानंतरच कळेल की, तिला जाळून मारले आहे की, तिने स्वत:च जाळून घेतले. जाळून मारल्याने शरीराचे सर्व अवयव भाजतात, तर याप्रकरणात महिलेच्या शरीराचा वरचा भागच जळालेला आहे. पाय पूर्ण सुरक्षित आहेत.
- पोलिस म्हणाले की, घटनेबद्दल आसपासच्या लोकांची चौकशी करण्यात आली. ते म्हणाले की, आग लागल्याची माहिती त्यांना जवळच खेळणाऱ्या लहान मुलांकडून मिळाली. जेव्हा ते पोहोचले तेव्हा घरात सासू, सासरा आणि नणंद होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...