आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • एअरपोर्टवर महिलेची विवस्त्र करून तपासणी, प्रेग्नंट असल्याचे पाहिजे होते प्रूफ; चेकिंग ऑफिसरवर कारवाई Pregnant Woman Strip Searched At Guwahati Airport Latest News And Updates Marathi

एअरपोर्टवर महिलेची विवस्त्र करून तपासणी, प्रेग्नंट असल्याचे पाहिजे होते प्रूफ; चेकिंग ऑफिसरवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - आसाममध्ये एअरपोर्टवर प्रेग्नेंट महिलेला चेकिंगदरम्यान विवस्त्र करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. वास्तविक, सीआयएसएफच्या महिला सब इन्स्पेक्टरला हे चेक करायचे होते की, महिला खरेच प्रेग्नंट आहे अथवा नाही. हे प्रकरण उजेडात आल्यावर सीआयएसएफने या घटनेवर खेद व्यक्त करत संबंधित ऑफिसरचे ट्रान्सफर केले आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण :
ही घटना रविवारची आहे, जेव्हा महिला तिच्या पतीसोबत वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर आसामवरून दिल्लीला परतत होती. महिलेच्या पतीने घटनेची माहिती देताना सांगितले की, ''अनेक हँडबॅग्ज सोबत असल्याने एअरलाइन्स स्टाफने आम्हाला काउंटरवर रोखले. यामुळे आम्ही घाईगडबडीत चेक-इनसाठी ठेवलेल्या बॅगमध्ये डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन विसरलो. यानंतर आम्हाला सिक्युरिटी चेकसाठी नेण्यात आले, तेव्हा सीआयएसएफ स्टाफने आम्हाला बोर्डिंग पास द्यायला नकार दिला आणि माझ्या पत्नीला प्रेग्नंट असल्याचा पुरावा मागितला. मी महिला सिक्युरिटी स्टाफला तिच्या प्रेग्नन्सीबाबत सांगितले आणि 12 जून रोजी दिल्लीहून गुवाहाटीला आलेल्या फ्लाइटचा बोर्डिंग पासही दाखवला. परंतु स्टाफ सारखे प्रेग्नन्सीचा प्रूफ देण्यासाठी दबाव टाकत होते. शेवटी महिला सब इन्स्पेक्टर माझ्या पत्नीला एका रूममध्ये घेऊन गेली, आणि तिला पूर्ण कपडे काढायला मजबूर केले. महिला ऑफिसरने प्रेग्नेंसी चेक करण्यासाठी तिचे पोटही दाबून पाहिले.''

 

ट्विट करून नोंदवला आक्षेप
घटनेबद्दल महिलेच्या पतीने एक ट्विटही केले. लिहिले, ''डिअर सीआयएसएफ, प्लीज एका प्रेग्नंट महिलेशी कसे वागले पाहिजे, हे आधी शिका. गुवाहाटी एअरपोर्टवर माझ्या गर्भवती पत्नीला सीआयएसएफ स्टाफने त्रास दिला. त्यांनी प्रेग्नेंसी चेक करण्यासाठी माझ्या पत्नीला विवस्त्र केले. या देशात प्रेग्नंट असणे गुन्हा आहे काय?'' 

 

CISFने व्यक्त केला खेद
सीआयएसएफने या घटनेबद्दल तक्रारकर्त्याला खेद व्यक्त केला आहे. त्यांनी त्या महिला सब इंस्पेक्टरचे ट्रान्सफर स्क्रीनिंग ड्यूटीमधून ट्रेनिंगमध्ये केले आहे.

  

बातम्या आणखी आहेत...