आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुंझुनूंला झुकणे माहित नाही, जिल्ह्यातील वाढलेल्या जन्मदराचे मोदींकडून कौतूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुंझुनूंच्या वाढलेल्या स्त्री जन्मदाराचे मोदींनी अभिनंदन केले. - Divya Marathi
झुंझुनूंच्या वाढलेल्या स्त्री जन्मदाराचे मोदींनी अभिनंदन केले.

झुंझुनूं/सीकर (राजस्थान) - राजस्थानमधील 33 जिल्ह्यांपैकी सर्वात कमी स्त्री जन्मदर राहिलेल्या झुंझुनूंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महिला दिनानिमित्त 'राष्ट्रीय पोषण मिशन'चे उद्घाटन करण्यात आले. या जिल्ह्यात आता स्त्रीयांची 1000 पुरुषांमागे 955 एवढी संख्या आहे. याचे पंतप्रधानांनी कौतूक केले. मोदी म्हणाले, 'ही वीर पुरुषांची भूमी आहे. या जिल्ह्याने सिद्ध केले आहे की युद्ध असेल नाही तर दुष्काळ, झुंझुनूंला झुकणे माहित नाही. ते फक्त लढतात. ज्या पद्धतीने या जिल्ह्याने बेटी बचाओ अभियानाला खऱ्या अर्थाने वाढवले आहे, देश त्यांची प्रेरणा घेईल.' यावेळी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी उपस्थित होत्या. 


झुंझुनूंने मला येथे येण्यास भाग पाडले 
- मोदी म्हणाले, आज संपूर्ण जगात अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत आहे. याला 100 वर्षे झाली आहे. संपूर्ण झुंझुनूं यासोबत जोडले गेले आहे. या जिल्ह्याने बेटी बचाओ - बेटी पढाओ अभियानात असे काम केले आहे की मला येथे येण्यास भाग पाडले आहे. या मातीला नमन करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत केली. 

 

झुंझुनूंला झुकणे माहित नाही 
- नरेंद्र मोदी म्हणाले, 'ही वीरांची भूमी आहे. या जिल्ह्याने सिद्ध केले आहे की युद्ध असेल नाही तर दुष्काळ प्रत्येक संकटाशी दोन हात करण्याची ताकद जिल्ह्यात आहे. ज्या पद्धतीने बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानात जिल्ह्याने सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम पुढे नेले आहे त्याची प्रेरणा देश घेणार आहे. परंतू कधी-कधी मन दुःखी होते, ज्या देशाला वेदापासून विवेकानंदांपर्यंतची परंपरा लाभली आहे तिथे बेटी बचाओसाठी आम्हाला पैसा का खर्च करावा लागतो? यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे दुःख असू शकत नाही.'

 

झुंझुनूंमध्येच कार्यक्रम का? 
- 2011 च्या जनगणनेमध्ये राजस्थानच्या 33 जिल्ह्यांमध्ये झुंझुनूंमधील स्त्री-पुरुष जन्मदारात मोठी तफावत होती. 1000 मुलांमागे येथे 837 मुली होत्या. यात आता सुधारणा झाली असून हा आकडा 955 पर्यंत गेला आहे. 
- 36 महिन्यांच्या प्रयत्नानंतर जिल्ह्याला आता देशातील मुलींचे घर म्हणून ओळख मिळाली आहे. या बदलामुळे झुंझुनूंचे अनेक संस्था आणि संघटनांकडून कौतूक झाले आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयानेही अनेक पुरस्कार देऊन जिल्ह्याला सन्मानित केले आहे. 


असा सुधारत गेला झुंझुनूंचा मुलांचा जन्मदर 

वर्ष 1000 मुलांमागे मुली 

2011 - 837
2014 - 892 
2015 - 910
2016 - 933 
2017 - 955

बातम्या आणखी आहेत...