आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदिगड- हरियाणातील सहा कारागृहांमधील कैद्यांना अाता ‘काऊ थेरपी’ दिली जाणार अाहे. या थेरपीत कैदी गाईंची सेवा करून गाईंचे शुद्ध दूधही प्राशन करतील. गाईत जादूई शक्ती असते. या शक्तीच्या संपर्कात अाल्याने कैद्यांमध्ये सुधारणा हाेईल, असा सरकारचा दावा अाहे.
राज्यातील कारागृहांत असलेल्या कैद्यांचे मानसिक व शारीरिक अाराेग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुनर्वसन याेजना सुरू करण्यात येत अाहे. ‘काऊ थेरपी’ याच याेजनेचा एक भाग अाहे. त्यानुसार सहा कारागृहांसाठी ६०० गाई खरेदी केल्या जाणार अाहेत. या गाईंसाठी गोठ्यांची निर्मितीदेखील केली जाणार असून, हे काम पुढील महिन्यात सुरू हाेईल. या याेजनेसाठी एक काेटी ५ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात अाले अाहे.
गाय हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा भाग अाहे. त्यांच्यात जादुई शक्ती असते व या शक्तीमुळे अनेक फायदे हाेतात. ‘काऊ थेरपी’तून कैद्यांना गुन्हेगारी जगतापासून दूर करण्यास मदत मिळेल. साेबतच गाईंसाठीही ही याेजना लाभदायक ठरू शकते, असे हरियाणातील गाेसेवा अायाेगाचे अध्यक्ष भनीराम मंगला यांनी सांगितले. यासह कारागृहात पालनपाेषण केल्या जाणाऱ्या गाईंचे दूध पिऊन कैदी शुद्ध हाेतील. तसेच त्यांची मानसिक स्थितीही सुधारेल. गाईंची सेवा करण्याने कैद्यांना गाईच्या जादूई व सकारात्मक शक्तीच्या संपर्कात राहण्याची संधी मिळेल, असा दावा कारागृह प्रशासनाने केला अाहे. याशिवाय गाईचे शेण व गाेमूत्राची स्थानिक बाजारात विक्री करण्याची व्यवस्थासुद्धा केली जाईल. गाेमूत्रात अस्थमा, मधुमेह, गुडघेदुखी, हाडांचे विविध अाजार बरे करण्याचे गुण असतात. त्यामुळे कारागृह परिसरात गाईंसाठी चारा उगवला जाणार अाहेे. यासह बायाेगॅस प्रकल्पाची उभारणी करण्याचेही नियाेजन अाहे. कारागृहांत कैद्यांद्वारे गाईंची देखभाल करण्याचा हा असा पहिलाच उपक्रम अाहे, असेही सांगण्यात अाले.
‘काऊ थेरपी’ देणारी पहिली गाेशाळा करनाल येथील कारागृहात उभारली जाणार अाहे. त्यानंतर अंबाला, जिंद, भिवानी, साेनीपत व राेहतक येथील कारागृहांतही असाच प्रयाेग केला जाईल. यापूर्वी मध्य प्रदेश व गुजरातमधील काही कारागृहांत गाेशाळा उभारण्यात अाल्या अाहेत. उत्तर प्रदेशील अाग्रा व अलाहाबाद येथील कारागृहांतही अशा गाेशाळा तयार करता येऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.