आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट गुरुवारी सकाळी काही तासांसाठी हॅक झाले होते. एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की हॅकर्सने तुर्की भाषेत ट्विटरवर काही मेसेज पोस्ट केले. वादग्रस्त पोस्ट हटवण्यात आल्या आहेत, आता सर्वकाही सुरक्षित आहे.
हॅकर्सने केले वादग्रस्त ट्विट
- गुरुवारी सकाळी एअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले. त्यानंतर तुर्की भाषेत काही ट्विट केले गेले.
- हॅकर्सने काही चुकीचे संदेशही दिले. त्याने एका ट्विटमध्ये म्हटले की, 'एक महत्त्वाची सूचना. आमच्या सर्व फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. आता आम्ही तुर्कीच्या एअरलाइन्ससोबत उड्डाण करणार.'
- हॅकर्सने एअर इंडियाचा लोगोही काढून टाकला होता. त्यासोबतच अधिकृततेचे निळ्या रंगाचे चिन्हही काढले होते.
- तुर्कीची सायबर आर्मी अईलदीज्त ग्रुपने हे केले असल्याची शंका आहे. या ग्रुपवर आधीही अनेक ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचा आरोप आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.