आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीच्या हत्येनंतर मृतदेहाशी बनवले संबंध, 5 मर्डरनंतर वासनांध सायको किलरने केले कबूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण महिला ऑफिसरची हत्या करून मृतदेहाशी शारीरिक संबंध बनवल्याचे सायको किलरने कबूल केले आहे. - Divya Marathi
तरुण महिला ऑफिसरची हत्या करून मृतदेहाशी शारीरिक संबंध बनवल्याचे सायको किलरने कबूल केले आहे.

धमतरी(छत्तीसगड) - 11 महिन्यांत 5 मर्डर करणाऱ्या सायको किलरने आता एक आणखी खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिस चौकशीत त्याने 3 वर्षांपूर्वी एका महिला ऑफिसरच्या हत्येचा गुन्हाही कबूल केला आहे. 2015 मध्ये 27 एप्रिल रोजी रात्री एडीओ (रूरल अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर) पिंगला राज यांची हत्या केली. मृत त्या वेळी किरायाच्या घरात राहत होती. जितेन्द्र त्या वेळी तिच्या घराजवळच एका जागी टाइल्स लावण्याचे काम करत होता. त्याने पिंगला यांची हत्या करून मृतदेहाशी संबंध बनवल्याचे कबूल केले आहे.

 

लेडी ऑफिसरच्या खुनाची बाब तिच्या प्रियकरानेही कबूल केली...
- रविवारी पोलिसांनी खुलासा केला की, कुरुद ब्लॉकच्या मरौद गावात पोस्टेड एडीओ पिंगला राज यांचा मृतदेह 28 एप्रिल 2015 रोजी सकाळी एका घरात आढळला होता. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा प्रियकर राकेश चंद्राकर याला अटक करून चौकशी केली तेव्हा त्याने पिंगला यांची हत्या केल्याचे कबूल केले होते. तथापि, 7 महिन्यांत पहिल्यांदा तो जामिनावर सुटून जेलबाहेर आलेला आहे.
- इकडे पोलिसांनी 5 खुनांचा आरोपी जितेंद्र ध्रुवची चौकशी केली, तेव्हा त्यानेही पिंगला यांची हत्या केल्याचे कबूल केले. जितेन्द्र ध्रुवने पोलिसांना सांगितले की, त्याने आणखी एक चोरी आणि हत्येचा कट रचला होता. सोबतच तो तेलीनसत्ती सोडून शेजारचे गाव अर्जुनीमध्ये किरायाच्या घरात शिफ्ट होणार होता, परंतु त्याआधीच पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली.

लेडी ऑफिसरच्या प्रियकराची आई प्रकरणाला समोर घेऊन आली..
- 5 खुनांचा आरोपी सायको किलर जितेंद्र ध्रुवची पोलिसांनी 3 दिवसांच्या रिमांडमध्ये कडक चौकशी केली. इकडे पिंगला राज हत्येतील आरोपात पोलिसांनी ज्या कथित प्रियकर राकेश चंद्राकरला अटक केली होती, त्याची आई गोमती यांनी एसपींना निवेदन सोपवून जितेन्द्रची पिंगला राज हत्येप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती.
- त्यांनी निवेदनात असेही म्हटले होते की, राजकीय दबावामुळे खोटे आरोप लावून राकेशला तुरुंगात टाकण्यात आले आहे. तथापि, त्याचे फिंगरप्रिंट घटनास्थळी आढळलेल्या फिंगरप्रिंटशी जुळले नव्हते. या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी जितेंद्रची चौकशी केली, तेव्हा त्याने पिंगला यांच्या हत्येचा गुन्हा कबूल केला.

 

3 घटना, ज्यामुळे हादरले अख्खे राज्य...  

 

केस 1- 2015 मध्ये 27 एप्रिलच्या रात्री एडीओ पिंगला राज यांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाशी शारीरिक संबंध बनवल्याचे कबूल केले.

केस 2- 2016 मध्ये 17 ऑगस्टच्या रात्री खपरी परिसरातील रहिवासी रुख्मिणी बाई आणि त्यांची मुलगी पार्वती बांडे यांची हत्या. जितेन्द्रने या घटनेतही पार्वतीच्या मृतदेहाशी शारीरिक संबंध बनवल्याचे सांगितले.

केस 3- 2017 मध्ये 12-13 जुलैच्या रात्री तेलीनसत्ती परिसरातील महेन्द्र सिन्हा, त्यांची पत्नी उषा आणि मुलगा महेश सिन्हा यांची हत्या केली. ही घटनाही जितेन्द्रने चोरी आणि वासनेसाठी केल्याचे कबूल केले. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, यासंबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...