आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सेक्ससाठी बळजबरीही घटस्फोटासाठी कारण होऊ शकते Forcefully Sex Could Be The Reason Of Divorce

सेक्ससाठी बळजबरीही घटस्फोटासाठी कारण होऊ शकते - हायकोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> पंजाब हरियाणा हायकोर्टाने म्हटले आहे, की लैंगिक संबंधांसाठी बळजबरी आणि अनैसर्गिक कृत्य हे नक्कीच घटस्फोटासाठी कारण ठरू शकते. 

 

चंदीगड - पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने जीवनसाथीसोबत बळजबरी लैंगिक संबंध आणि अनैसर्गिक पद्धतीचा वापर करणे, या आधारावर घटस्फोट दिला जाऊ शकतो असा निर्णय दिला आहे. भठिंडा येथील एका महिलेचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते, तिने घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिका स्वीकार हायकोर्टाने स्वीकारली आणि हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळताना म्हटले होते, की महिलेला हे सिद्ध करावे लागेल की तिच्या इच्छेविरुद्ध पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स केला आहे. कोर्ट म्हणाले होते, की महिलेने वैद्यकीय अहवालात एखाद्या खास उदाहरणाच उल्लेख केलेला नाही. 

पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे जस्टिस एम.एम.एस बेदी आणि जस्टिस हरपाल वर्मा यांच्या खंडपीठाने एक जून रोजी या प्रकरणावरील आपला फैसला दिला. त्यात म्हटले,'आम्हाला वाटते की याचिकाकर्त्यांचा दावा चुकीच्या पद्धतीने रद्दबातल करण्यात आला होता.'
- कोर्ट म्हणाले, 'जीवनसाथीसोबत  गुदा मैथून, बळजबरीचे लैंगिक संबंध आणि अनैसर्गिक कृत्य करणे, ज्याचा परिणाम एवढा वाईट होईल की जीवनसाथीला त्या वेदना असह्य  होतील आणि तिला वेगळे होण्याची वेळ येईल. हे नक्कीच घटस्फोटाचे कारण होऊ शकते.'

महिलेचा आरोप होता की,'पती त्याची काम वासना पूर्ण करण्यासाठी तिला नेहमी मारहाण करायचा आणि अनैसर्गिक संबंधांसाठी बळजबरी करायचा.' 
हायकोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले की महिलेने केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. 
कोर्ट म्हणाले, हे आरोप कोणत्याही प्रामाणिक साक्षीद्वारे सिद्ध होऊ शकत नाही, कारण हे अशा प्रकारचे कृत्य आहे जे अन्य व्यक्तीद्वारे पाहिले जाऊ शकत नाही आणि वैद्यकीय अहवालातही प्रमाणित केले जाऊ शकत नाही. 
- हायकोर्ट म्हणाले, 'यात काहीच शंका नाही की असे आरोप करणे फार सोपे आणि सिद्ध करणे फार अवघड आहे.'
- हायकोर्टाने हेही सांगितले की कोणत्याही कोर्टाने अशा प्रकारचे आरोप स्वीकार करण्यापूर्वी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. मात्र त्यासोबतच परिस्थितीचाही आढावा घेतला पाहिजे. 
- कोर्ट म्हणाले, की रेकॉर्डमध्ये उपलब्ध परिस्थितीतून हे संकेत मिळतात की याचिकाकर्ताने असाहाय परिस्थितीमध्ये वैवाहिक घर सोडले. 
- कोर्ट म्हणाले, महिलेसोबतचे क्रौर्य हे मानसिक असण्यासोबतच ते शारीरिकही आहे. 
- कोर्ट म्हणाले घटस्फोटाच्या आदेशासह हे लग्न संपवले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...