आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा रक्षकांत कपात केल्याने राबडीदेवींनी सुरक्षाच नाकारली, मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी सुरक्षा रक्षक कमी असल्याने नाराजी व्यक्त केली. ही संख्या मंगळवारी रात्री घटवण्यात आली होती. त्यानंतर राबडींनी सुरक्षा व्यवस्थाच नको असल्याचे सांगितले. त्यांची मुले,  विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि आमदार तेजप्रताप यादव यांनीही संपूर्ण सुरक्षा नाकारली आहे.

 

राबडीदेवींनी यासंबंधी बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पत्र लिहिले. माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना व त्यांचे पती लालूप्रसाद यादव यांना बिहार सैन्य पोलिस दलाचे (बीएमपी) कमांडो सुरक्षेसाठी २००५ मध्ये देण्यात आले होते. मंगळवारी रात्री ही व्यवस्था काढून घेतली गेली. त्यांच्यासोबत आणि घरासमोर केवळ देखाव्यासाठी सुरक्षा रक्षकांची तैनाती करू नये. या निर्णयावर नाराज झाल्याने आपण उर्वरित सुरक्षा व्यवस्था व सरकारी गाडी परत करत आहोत, असे राबडींनी पत्रात लिहिले आहे.  


जनताच आता संरक्षण करेल : माझ्याविरुद्ध व माझ्या कुटुंबीयांविरुद्ध नितीशकुमार व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हत्येचा कट रचत आहेत. सरकारी निवासस्थान काढून घेतले तरीही मी ते रिकामे करेल. बुधवारी सकाळी आपण सुरक्षा रक्षकांना परत पाठवल्याचे पत्र परिषदेत राबडीदेवींनी सांगितले.  


राजद कार्यकर्ते नाराज :  लालूप्रसाद यादव व राबडीदेवींच्या सुरक्षेत घट केल्याने राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

तेजस्वी यादवांचा आरोप  
मुख्यमंत्री नितीशकुमार यांना गेल्या १० महिन्यांत सुरक्षेची श्रेणी निश्चित करणे आणि वाढवण्यासंंबंधी अनेकदा पत्र पाठवल्याचे तेजस्वी यांनी म्हटले आहे. ईर्षेपोटी नितीश सुरक्षा वाढवण्याऐवजी घटवत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सीबीआयद्वारे आपल्या निवासस्थानी चौकशी  केल्यानंतर हाऊस गार्ड हटवण्याचा निर्णय तडकाफडकी घेण्यात आला आहे. तुच्छ भावनेने हे केले जात आहे.

 

बिहार सैन्य पोलिस दलाचे ३२ कमांडो होते  
माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी पूर्वी बिहार सैन्य पोलिस दलाचे (बीएमपी) ३२ कमांडो तैनात होते. अपर पोलिस महानिर्देशक मुख्यालयातील एस. के. सिंघल यांनी सांगितले की, महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्यासंबंधी समिती गठित केली आहे. ही समिती व्यक्तींचे पद व त्यांच्या जीविताला असलेल्या धोक्यासंबंधी आढावा घेत आहे. वेळोवेळी याचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया सुरू असते.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सुरक्षेत घट नाही; लालूप्रसाद अनुपस्थित असल्याने बदल, पोलिसांचा खुलासा...

बातम्या आणखी आहेत...