आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • जेव्हा आजी इंदिरांनी विमानात साजरा केला होता राहुल गांधींचा बर्थडे, फोटो झाला व्हायरल Rahul Gandhi Birthday News Photos Go Viral

जेव्हा आजी इंदिरांनी विमानात साजरा केला होता राहुल गांधींचा बर्थडे, Photo झाला Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - अमेठीचे खासदार आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी 19 जून रोजी 48 वर्षांचे झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पीएम नरेंद्र मोदींनीही त्यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व विशेसदरम्यान त्यांचे काही जुने फोटोही व्हायरल होत आहेत. यापैकी एकात ते आपली आजी इंदिरा गांधी, आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंकासोबत विमानात बर्थडे सेलिब्रेट करत आहेत.

 

विमानात कापला होता 7th बर्थडे केक
- ट्विटरवर व्हायरल फोटो 1977 चा असल्याचे सांगितले जात आहे. 1970 मध्ये जन्मलेले राहुल यांचा तो 7वा बर्थडे होता.
- एका खासगी जेटमध्ये घेण्यात आलेल्या फोटोत राहुल आई सोनिया गांधींसोबत बसले आहेत. समोरच्या सीटवर आजी इंदिरा गांधी आणि बहीण प्रियंका आहेत. टेबलवर एक केक ठेवलेला आहे.
- या फोटोसोबतच राहुल गांधींच्या बालपणीचे फोटोही शेअर होत आहेत.

 

या लोकांनी केले विश
- राहुल गांधींना ट्विटरवर नरेंद्र मोदींशिवाय लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव, काँग्रेस नेता अभिषेक सिंघवी, जर्नलिस्ट रजत शर्मा यांच्यासह अनेक सेलेब्सनी बर्थडे विश केला आहे.
- भाजप नेता तजिंदरपाल सिंह बग्गा यांनी विनोदाने लिहिले, "मी माझे मित्र, भाजपचे स्टार कॅम्पेनर आणि अपोजिशनचे पीएम केंडिडेट (सन 2019, 2024, 2029, 2034 साठी) राहुल गांधींच्या बर्थडेवर 1 लिटर शिकंजी ऑर्डर केली आहे. तुम जियो हजारों साल, साल में रैली करो 50 हजार...।"

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, राहुल गांधींच्या बालपणीचे आणखी काही फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...