आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविराेध; माेदींच्या शुभेच्छा : कार्यकाळ फलदायी हाेवाे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची बिनविरोध निवड झाल्याची घाेषणा सोमवारी करण्यात आली. ते आई व १९ वर्षे अध्यक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सोनिया गांधींची  जागा घेतील.

 

अध्यक्षपदी आरूढ होणारे ते नेहरू-गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती व ६० वे अध्यक्ष आहेत. राहुल गांधी २०१३ पासून पक्षाच्या उपाध्यक्षपदी होते. त्यांच्या निवडीनंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाया वाटून आनंद साजरा केला. पंतप्रधान  मोदी यांनीही तुमचा कार्यकाळ फलदायी होवाे, अशा शुभेच्छा राहुल यांना ट्विटरवरून दिल्या.गुजरात निवडणूक निकालाच्या २ दिवसांआधी १६ डिसेंबरला ४७ वर्षीय राहुल औपचारिकपणे हे पद स्वीकारतील. काँग्रेस नेते मुल्लाप्पली रामचंद्रन म्हणाले, अर्ज परत घेण्याची शेवटची मुदत सोमवारी संपल्यानंतर रिंगणात राहुल गांधी हेच एकमेव उमेदवार होते. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

नेहरू-गांधी घराण्यांत ४४ वर्षे अध्यक्षपद 
१३२ वर्षे जुन्या काँग्रेसचे अध्यक्षपद ४४ वर्षे गांधी-नेहरू  घराण्यातील व्यक्तीकडे राहिले आहे. याअाधी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी हे अध्यक्ष हाेते.

 

पुढील स्लाइड्सवर...अमित शहा व राहुल यांची रोचक तुलना, पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...