आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिमला/नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी हिमाचल प्रदेशात मिळालेल्या पराभवाबाबत मंथन करणार आहेत. त्यासाठी राहुल गांधी शिमल्यात आढावा बैठक घेत आहेत. राहुल गांधींनी निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार आणि सर्व जिल्ह्याच्या जिल्ह्याध्यक्षांना बैठकीत बोलावले असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 21 जागा मिळवण्यात यश मिळाले आहे. त्यापूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती आणि वीरभद्र सिंह मुख्यमंत्री होते.
वीरभद्र जिंकले पण काँग्रेसचा पराभव
- हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने वीरभद्र सिंह यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत केले होते. वीरभद्रच नव्हे तर त्यांचा मुला विक्रमादित्य सिंहही या निवडणुकीत विजयी झाले.
- पण हे दोघे जिंकले अशले तरी, कांग्रेसला हिमाचल प्रदेशात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. 68 पैकी काँग्रेसला फक्त 21 जागांवर विजय मिळवता आला. भाजपने 44 जागा जिंकल्या. तर दोन अपक्ष निवडून आले.
लोकसभेची तयारी
- मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल गांधी शुक्रवारी हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांना भेटून पराभवाच्या कारणांचा आढावा तर घेतीलच. पण त्याचबरोबर 2019 मधील लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचनादेखिल केली जाईल.
- राहुल गांधी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलण्याचीही शक्यता आहे.
हिमाचलही भाजपकडे
- भाजपने हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली असून जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. पक्षाने 68 पैकी 44 जागांवर विजय मिळवला आहे.
- भाजपने प्रेम कुमार धूमल यांना हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले होते. पण त्यांचाच पराभव झाला. त्यानंतर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अखेर जयराम ठाकूर यांनी राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी बुधवारी शपथ घेतली.
- हिमाचल प्रदेशात ठाकूर मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपने येथे ठाकूर कम्युनिटीचे नेते जयराम यांना मुख्यमंत्री बनवले आहे. आदी रेसमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांचे नावही समोर आले होते. काँग्रेसला हिमाचलबरोबरच गुजरातमध्येही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.