आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधींनी कर्नाटकात प्रसिद्ध केला काँग्रेसचा जाहीरनामा, म्हणाले- हा जनतेचा आवाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला. - Divya Marathi
जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

मंगलोर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनामा प्रसिद्ध करताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही हा जाहीरनामा तयार करताना सर्वसामान्य जनतेच्या मनातील बाबी यात मांडल्या आहेत. राहुल गांधी म्हणाले, आमच्या सरकारने जी आश्वासने दिली होती ती करुन दाखवली आहेत. 

 

आमच्या करणी आणि कथनीत फरक नाही
- राहुल गांधी म्हणाले, आमचा आमच्या विचारांवर विश्वास आहे. जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा त्याला अर्थ असला पाहिजे. 
- ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी कर्नाटकातील जनतेला आम्ही जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले. आम्ही आणि आमच्या सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये फरक नाही. 

 

हा जनतेचा जाहीरनामा 
- भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, तुम्ही पाहिले असेल की भाजपचा जाहीरनामा हा निवडक तीन-चार लोक बसून तयार करतात. त्यात बरेच काही लपलेले असते. त्यात रड्डी बंधूंची आयडिया असते. तो कर्नाटकच्या जनतेचा जाहीरनामा नसतो तर आरएसएसचे घोषणापत्र असते. हाच काँग्रेस आणि विरोधकांमधील फरक आहे. 
- मोदी बोलतात एक आणि करतात दुसरे, असा टोला लगावत राहुल गांधी म्हणाले, 'ते त्यांच्या वक्तव्यावर कायम राहात नाही. मोदींनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. 1 रुपयाही दिलेला नाही.'
- भ्रष्टाचारातही भाजप कमी नसल्याची टीका राहुल यांनी केली. ते म्हणाले, 'राफेलसह एकानंतर एक घोटाळे समोर येत आहेत. अमित शहांचा मुलगा, नीरव मोदीचा घोटाळा, विजय माल्ल्या यांच्याच काळात पळून गेला. दुसरीकडे मोदी सरकार शेतकऱ्यांचा छळ करत आहे.'

बातम्या आणखी आहेत...