आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक: राहुल गांधी नारायण गुरु मंदिरात, म्हणाले- \'आम्ही शेतकऱ्यांचे 8 हजार कोटींचे कर्ज केले माफ\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी मंगळवारी कर्नाटकमधील नारायण गुरु मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले. - Divya Marathi
राहुल गांधींनी मंगळवारी कर्नाटकमधील नारायण गुरु मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले.

बंगळुरु - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी कर्नाटकमध्ये पोहोचले. राहुल गांधींनी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्याची सुरुवात उडुपी येथील नारायणगुरु मंदिर दर्शनाने केली. एका रॅलीमध्ये ते म्हणाले, कर्नाटकमधील सिद्धारमय्या सरकारने शेतकऱ्यांचे 8 हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. काँग्रेस अध्यक्ष कर्नाटकमधील वोक्कालिगा बहुल भागाचा दौरा करणार आहे. लिंगायत समाजाप्रमाणेच वोक्कालिगा समाजाचा कर्नाटकच्या राजकारणावर प्रभाव आहे. कर्नाटकमधील 224 मतदारसंघापैकी 25% आमदार हे या समाजाचे आहेत. 

 

शेतकरी कर्जमाफीवरुन मोदी सरकारवर निशाणा 
- राहुल गांधी यांनी दौऱ्याची सुरुवात आक्रमक केली आहे. कर्नाटकमधील पहिल्याच सभेत काँग्रेस अध्यक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला तर कर्नाटकमधील सिद्धारमय्या सरकारच्या कामाचे कौतूक केले. 
- ते म्हणाले, 'मोदी सरकारने गेल्यावर्षी 15 श्रीमंतांचे 2.5 लाख कोटींचे कर्ज माफ केले. शेतकरी कर्जमाफीबद्दल जेव्हा त्यांना विचारणा केली जाते तेव्हा मोदीजी आणि अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात याचे आम्ही आश्वासन दिले नव्हते. याउलट कर्नाटकमधील काँग्रेसच्या सिद्धारमय्या सरकारने शेतकऱ्यांचे 8 हजार कोटींचे कर्ज माफ केले.'


 राहुल गांधींच्या यावेळच्या दौऱ्याचे महत्त्व? 
 
कुठे जाणार - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उडुबी, दक्षिण कन्नड, चिकमंगलुर आणि हासन येथे जाणार आहेत. 
कोणाचा प्रभाव - या भागात वोक्कालिगा समाजाचा प्रभाव आहे. कर्नाटकमध्ये यांची लोकसंख्या 11% आहे असून विधानसभेत या समाजाचे 25% अर्थात 55 आमदार आहेत. 
 स्थानिक नेते - हासन जिल्हा हा  जनता दल सेक्यूलरचे (जेडीएस) प्रमुख एचडी देवेगौडा यांचे होमग्राऊंड आहे. 
 
राहुल गांधींचे मंदिर दर्शन सुरुच राहाणार? 
 - काँग्रेसच्या 84व्या महाअधिवेशनातील भाषणात राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते की मी आधीही मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारा येथे जात होतो आणि आताही जर कोणी बोलावले तर जाणार. 
 - कर्नाटकमध्येही राहुल गांधी धार्मिक स्थळांना भेटी देण्याची शक्यता आहे. अशी माहिती आहे की ते येथे गोरखनाथेश्वर मंदिर, रोयारियो चर्च, उल्लाल दर्गा, श्रृंगारी शरदंबा मंदिर आमि श्रृंगेरी मठाला भेट देणार आहेत. 
- जगद्गुरु शंकराचार्य आणि श्रृंगेरी मठाचे भारती तीर्थ स्वामीजी यांची राहुल गांधी भेट घेणार आहेत. 

 

अशी आहे कर्नाटक विधानसभा 

- कर्नाटक विधानसभा 224 सदस्यांची आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता असते. येथे 4.9 कोटी मतदार आहे. 

- कर्नाटकाच्या राजकारणावर परिणाम करणारे दोन समाज आहेत. वोक्कालिगा आणि लिंगायत यांची राज्यातील लोकसंख्या अनुक्रमे 11 आणि 17 टक्के आहे. सध्याच्या विधानसभेत वोक्कालिगा समाजाचे 55 तर लिंगायत समाजाचे 52 आमदार आहेत. 

 

काय आहे काँग्रेसची रणनीती? 
- कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या हे लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधींसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. मात्र संघटनेमध्ये त्यांचे सहकार्य नसते यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीची धुरा स्वतः राहुल यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याची माहिती आहे. 

 

भाजपची रणनीती काय आहे? 
- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 22 ते 24 फेब्रुवारी दरम्यान राज्याचा दौरा केला होता. ते देखील मठ आणि मंदिरात जाऊन आले होते. भाजप राज्याची निवडणूक हिंदूत्वाच्या मुद्दावर लढण्याच्या तयारीत आहे. त्यांचा आरोप आहे की सिद्धारमय्या सरकारने संघाच्या 24 कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...