आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Says Under United Oppn Even Modi May Lose Varanasi In 2019 राहुल यांनी अमेठी रायबरेलीची चिंता करावी भाजपचा पलटवार

राहुल यांनी अमेठी-रायबरेलीची चिंता करावी: मोदींबद्दलच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, 2019 लोकसभा निवडणुकीत जर विरोधक एकत्र आले तर भाजपचा विजय तर दूरच नरेंद्र मोदी स्वत: वाराणसीतून पराभूत होतील. 

यावर भाजपने म्हटले की, राहुल यांनी अमेठी आणि सोनियांनी रायबरेलीची काळजी करावी. आजच्या स्थितीत ते आपापल्या मतदारसंघातून पराभूत होत आहेत. राहुल रविवारी कर्नाटकच्या 6व्या निवडणूक दौऱ्यावर होते. ते म्हणाले की, प्रत्येक विरोधी पक्षाचा आपला अजेंडा आहे, परंतु भाजपविरुद्ध सर्व पक्ष एकत्र येण्यासाठी तयार होतील. त्यांनी कोलार आणि चिकबल्लापूर जिल्ह्यातही सभा घेतली. तथापि कर्नाटकात 12 मे रोजी मतदान होईल आणि निकाल 15 मेला येणार आहेत.


चुकीच्या धोरणांविरुद्ध विरोधक एक होतील 
- राहुल गांधी म्हणाले, "भाजपविरुद्ध विरोधक एकत्र येणे गरजेचे आहे. जर सपा आणि बसपा काँग्रेससोबत आले, तर मोदी वाराणसीतून जिंकूच शकणार नाहीत. सर्व पक्षांच्या आपल्या वैयक्तिक आणि क्षेत्रीय महत्त्वाकांक्षा आहेत, परंतु सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध सर्व एक होतील. आम्ही पुन्हा सत्तेत परतू."

बातम्या आणखी आहेत...