आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raid In Lucknow Income Tax Department Got Crores And 100 Kg Gold From Hawala Business In Up

IT RAID: 100 किलो सोने अन् 10 कोटींची रोकड जप्त, लखनऊमध्ये व्यावसायिक बंधूंच्या 5 जागांवर पर प्राप्तिकर विभागाचे छापे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- रस्तोगी बंधूंच्या जागांवर आढळलेल्या सोन्याचे मूल्य 32 कोटी रुपयांहून जास्त. 

- प्राप्तिकर विभागाच्या 40 अधिकाऱ्यांच्या टीमची रस्तोगी अँड सन्सच्या जागांवर कारवाई.

 

लखनऊ - उत्तर प्रदेशात रस्तोगी अँड सन्सच्या 5 जागांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली. यादरम्यान 100 किलोग्रॅम सोने आणि जवळजवळ 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एका ऑफिसरने सांगितले की, 16 लाख रुपये सोडून उर्वरित रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले आहे. रस्तोगी कुटुंबाच्या नावे 98 कोटींच्या अघोषित संपत्तीचे दस्तऐवजही मिळाले आहेत. या प्रदेशात प्राप्तिकर विभागाचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे.

 

प्राप्तिकर उपायुक्त रवी मल्होत्रा म्हणाले, प्राप्तिकर विभागाच्या 40 अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी छापेमारी सुरू केली, जी बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. कंपन्यांच्या लॉकर्सची तपासणी बाकी आहे. व्यावसायिक कन्हैया लाल आणि त्यांचा भाऊ संजय रस्तोगी यांना जप्त केलेल्या सोन्याचा आणि रकमेचा हिशेब देता आलेला नाही. बहुतांश रक्कम 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांमध्ये आढळली. एसबीआयच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने 10 तासांत या रकमेची मोजणी करण्यात आली. सूत्रांनुसार, दोन्ही भावांचे वेअरहाऊस, वीटभट्टी, फायनान्स, रिअल इस्टेट आणि ज्वेलरीचा व्यवसाय आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos.. 

 

बातम्या आणखी आहेत...