आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Photos: वादळामुळे राजस्थाना एवढा विध्वंस; उन्मळून पडले वृक्ष, छत गेले उडून Rain And Storm In Rajasthan Different Reason

Photos: वादळामुळे राजस्थानात एवढा विध्वंस; उन्मळून पडले वृक्ष, छत गेले उडून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - वादळामुळे राजस्थानच्या 4 जिल्ह्यांमध्ये बुधवारी मोठा विध्वंस घडवला. यादरम्यान 27 जणांचा मृत्यू झाला. 120 किमी प्रति तास वेगाने आलेल्या वादळाने मोठी वित्त व जीवितहानी झाली. यात काही ठिकाणी मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली, तर कुठे विजेचे खांब कोसळले. अनेक ठिकाणी घरांचे छतही पडले. काही गावांमध्ये आगही लागल्याचे समोर आले.

- अलवरमध्ये वादळामुळे घरांच्या टीनशेड आणि छतांवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या उडून गेल्या. येथे एका लहान मुलीसमवेत 3 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जखमी झाले.
- यादरम्यान अनेक झाडे आणि विजेचे खांब कोसळले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच रेल्वे ट्रॅकवर झाडे आणि पोल पडल्याने दळणवळण ठप्प झाले.

 

मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दिले बचाव कार्याचे निर्देश

- मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांनी या आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींसाठी शोक व्यक्त करून सर्व आवश्यक मदत देण्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या मृत्यूंनंतर काँग्रेस महासचिव अशोक गहलोत यांनी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे म्हटले आहे.


भरतपुरात 10, धौलपुरात 6, अलवरमध्ये 3, झुंझुनूंत 1 जण ठार
- बिकानेरमध्ये 38 किमी वेगाने होते वादळ.
- यादरम्यान राज्यात 500 मीटर व्हिजिबिलिटी राहिली.

 

घराचे छत पडून एकाचा मृत्यू
- झुंझुनूंच्या रवां गावात एका बांधकाम सुरू असलेल्या घराचे छत पडून एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच एका मुलीसमवेत 5 जण जखमी झाले. त्यांना सिंघानाच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जणाला जयपूरला रेफर करण्यात आले.
- अलवरमध्ये वादळामुळे जुन्या भाजी मंडईतील एक झाडाखाली दबून बरखेडा येथील रहिवासी 27 वर्षीय राकेश जांगिड यांचा मृत्यू झाला. बहरोड़मध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला. अलवर-रामगड रोडवर सुधासागर गोशाळेजवळ कारवर झाड कोसळल्याने मुकेश (45) यांचा मृत्यू झाला. त्यांचे तीन सोबती गंभीर जखमी झाले.

 

वादळामुळे बिकानेरमध्ये 10 आणि जयपुरात 8 डिग्रीने तापमान घटले

- बिकानेरमध्ये 38 किमी प्रति तास वेगाने वादळ चालले, यामुळे पारा 45 डिग्रीने घटून 35 डिग्रीवर आले. जयपुरात वादळाचा वेग 18 किलोमीटर प्रति तास राहिली. वादळामुळे दृश्यमानता 500 मीटर होती. जयपुरात पारा 42.7 डिग्री होता, जो संध्याकाळी वेगवान वाऱ्यांमुळे 8 डिग्री सेल्सियस कमी होता. दुसरीकडे बुधवारी बूंदी भागात सर्वात जास्त गरम राहिला. येथे कमाल तापमान 47 डिग्री नोंदवण्यात आले. जैसलमेर आणि कोटामधील तापमानही 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहिले. दुसरीकडे पिलानीमध्ये 23.7 एमएम पाऊस नोंदवण्यात आला.

 

या कारणामुळे येतात वादळे
- बहुतांश वाळवंट भूमध्य रेषेच्या अवतीभोवती आहे. या परिसरात वायुमंडलीय दाब खूप जास्त असतो.
- हा दाब उंचीवरील थंड शुष्क हवेला जमिनीपर्यंत आणतो. यादरम्यान सूर्याची थेट किरणे या हवेतील आर्द्रता संपुष्टात आणतात.
- आर्द्रता संपल्याने ही हवा खूप जास्त उष्ण होते. यामुळे पाऊस होऊ शकत नाही आणि जमीन आणखी शुष्क व गरम होते.
- जमीन गरम झाल्याने आर्द्रतेच्या अभावात धुलिकण एकसंध राहू शकत नाहीत. यामुळे ते हवेसोबत प्रवाहित होऊन सहजच वर उठतात.
- हवेचा वेग 40 किलोमीटरपेक्षा जास्त झाल्यावर हे धूलिकण एक वादळाचे रूप धारण करतात.
- वादळामुळे धूलिकण 10 ते 50 फुटांच्या उंचीपर्यंत उठतात. अनेक वेळा ते यापेक्षाही अधिक उंचीपर्यंत पोहोचतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या वादळामुळे झालेल्या विध्वंसाचे फोटोज...   

बातम्या आणखी आहेत...