आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानमधील वादळातून घरे-सरकारी कार्यालये काहीही सुटले नाही, वसुंधरांनी केले हे ट्विट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरांवर वीजेचे खांब पडले तर कुठे झाडे उन्मळून पडली. - Divya Marathi
घरांवर वीजेचे खांब पडले तर कुठे झाडे उन्मळून पडली.

जयपूर - वादळी वाऱ्याने राजस्थानमधील चार जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान केले आहे. बुधवारी आलेल्या वादळात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने आलेल्या वादळाने होत्याचे नव्हते करुन टाकले. कुठे झाडे उन्मळून पडली तर कुठे वीजेचे खांब. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तर कुठे छत पडले आहे. सामान्यांच्या घरांना जसा वादळाचा फटका बसला तसाच सरकारी कार्यालयांनाही बसला आहे. मुख्यंत्री वसुंधरा राजेंनी या वादळानंतर ट्विट करुन नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. 

 

अलवर, भरतपूर आणि धौलपूरमध्ये वादळाचा कहर 
- अलवरमध्ये अनेक घरांवरील पत्रे आणि पाण्याच्या टाक्या उडून गेल्या. येथे एका बालकासह 3 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. 
- अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर झाडे आणि वीजेचे खांब पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. 

 

वसुंधरा राजेंनी केले ट्विट 
- मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करुन या वादळामुळे झालेल्या नुकसानीने मन व्यथित झाल्याचे म्हटले आहे. पीडितांपर्यंत मदत पोहोचवली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. ज्यांनी आपले प्रियजन या वादळात गमावले त्यांच्याबद्ल सद्भावना व्यक्ती केली. 

 

अशोक गहलोत यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला 
- काँग्रेस नेते  आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करुन सांगितले की आज माझ्या घरी होणारे वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. फक्त ब्लड डोनेशन कॅम्प होणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, वाळूच्या वादळाने काय-काय उडवून नेले.. 

बातम्या आणखी आहेत...