आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत म्हणाले-राजकारण माझ्यासाठी नवे नाही, पण अंतिम निर्णय 31 डिसेंबरलाच घेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत म्हणाले आहेत की, राजकारण माझ्यासाठी नवे नाही पण राजकारणाबाबत अंतिम निर्णय 31 डिसेंबरला जाहीर करणार आहे. याचवेळी रजनी म्हणाले की, मी जरा उशीर केला आहे हेही खरे आहे. पण तरीही याबाबतचा अंतिम निर्णय मी 31 डिसेंबरलाच सांगेल. रजनीकांत राजकारणात येणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा आहे. रजनिकांत यांनी मात्र याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. 


सहा दिवस फॅन्सना भेटणार 
- रजनीकांत त्यांच्या फॅन्सना सहा दिवस भेटणार आहेत. मंगळवारी फॅन्सबरोबरच्या पहिल्या भेटीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच फोटो सेशनमध्येही ते सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजीही केली. 
- रजनीकांत म्हणआले, सध्या मी हे म्हणत नाही की मी राजकारणात येईलच. पण याबाबतचा अंतिम निर्णय मी 31 डिसेंबरला घेईल. 


काही प्रमाणात संकोच आहेच.. 
- रजनीकांत यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. अमिताभ बच्चनबरोबर त्यांनी अंधा कानून आणि हम सारखे चित्रपट केले आहेत. 
- रजनीकांत म्हणाले, पॉलिटिक्समध्ये प्रवेश करण्याबाबत विचार करतो तेव्हा मला काहीसा संकोच नक्कीच वाटतो. कारण मला याबाबत काहीही माहिती नाही. 
- फॅन्सशी भेटण्याबाबत ते म्हणाले, फॅन्सना भेटून मला खूप आनंद मिळतो. फॅन्सना केव्हा आणि कसे भेटायचे याबाबत मी आधीच निर्णय घेतला होता. 

 

तयारीही करावी लागते.. 
- राजकारणात प्रवेशाबाबत रजनीकांत म्हणाले, रणांगणात उतरण्याआधी तयारी तर करावीच लागते. विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलो नाही तर त्याला काही अर्थ उरत नाही. 
- युद्धाचा अर्थ निवडणूक जिंकणे आहे. पण सध्या ते शक्य आहे का? यावेळी त्यांनी तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांचे स्मरणगी केले. जयललिता मला भेटायला घरी आल्या तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता, असे ते म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...