आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लुधियाना - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहाणारी बॉलिवूड अॅक्ट्रेस राखी सावंत हिने वाल्मिकी समाजाची माफी मागितली आहे. विशेष म्हणजे, ज्या वकिलाने राखीवर खटला दाखल केला होता, त्यांच्यासोबत तिने इमोशनल करार करुन त्यांना धर्म-बंधु केले आहे. शुक्रवारी लुधियानाला आलेल्या राखी सावंतने तिच्यावर खटला दाखल करणाऱ्या अॅड. नरिंदर आदिया यांची भेट घेतली.
काय आहे प्रकरण
- अॅड. नरिंदर आदिया यांनी 9 जुलै रोजी राखी विरोधात वाल्मिकी समाजाचा अपमान केल्याचा खटला दाखल केला होता.
- यामध्ये आरोप करण्यात आला होता, की एका प्रायव्हेट टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते.
राखी म्हणाली - बहिण भावाच्या मनधरणीसाठी आली
- कायद्याच्या कचाट्यात अडकत चाललेली राखी सावंत हिने अॅड. नरिंदर यांच्यासोबत शुक्रवारी इमोशनल करार केला, त्यानंतर दोघांमध्ये काँप्रोमाइज-डीड तयार करण्यात आली. दोघांनी त्यावर स्वाक्षरी केली.
- त्याआधी मीडियासमोर आलेल्या राखीने या प्रकरणावर अशा अंदाजात उत्तर दिले की शेजारी बसलेले अॅड. नरिंदर हे देखील भावूक झाले.
- राखी सावंत म्हणाली, 'आज बहिण आपल्या भावाचा मनधरणी करायला आली आहे. माझे कोणासोबतही भांडण नाही. मी वाल्मिकी समाजाचा आदर करते. मी बाबासाहेबांची बेटी आहे. काही गैरसमज झाले होते. त्यावर आज चर्चा करुन ते दूर केले जातील.'
- राखी म्हणाली, 'माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी माफी मागते. याआधीही मी कोणतेही किंतू-परंतू न ठेवता माफी मागितली होती.'
- अॅड. नरिंदर आदिया म्हणाले, 'राखीने आधीही माफी मागितली होती. मात्र मी तिला कोर्टात माफी मागण्यास सांगणार होतो, जेणे करुन भविष्यात कोणी वाल्मिकी समाजाविरोधात चुकीचे आणि अवमानकारक बोलू नये. या केसमध्ये माझा वैयक्तिक काहीच हेतू नव्हता.'
- दोन्ही बाजू 17 मे रोजी कोर्टासमोर येऊन समोरासमोर केस मागे घेणार आहेत.
आम्ही तयार करणार रियल स्टोरी ऑफ सर्बजीत
- राखी सावंत सध्या बाबा राम रहिम यांच्यावर आधारित फिल्ममध्ये त्यांची दत्तक मुलगी हनीप्रीतची भूमिका करत आहे.
- लवकरच ती 'रियल स्टोरी ऑफ सर्बजीत' मध्ये त्याच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. फिल्मचे प्रोड्यूसर जेम्स रॉयल म्हणाले, याआधी आलेल्या चित्रपटाच्या कथेत त्याची बहीण दलबीर ही सर्बजीतची बहीण नव्हती. आम्ही सत्यकथा घेऊन येत आहोत. त्यासाठीचे पुरावे आमच्याकडे आहेत. पंजाबमध्ये मेमध्ये या चित्रपटाचे शुटिंग सुरु होणार आहे. या फिल्ममध्ये राजपाल यादव असणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.