आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12वी पास आहे बलात्काराचा आरोपी भाजप आमदार, वापरतात 17 लाखांची SUV

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्नाव - जिल्ह्यातील आमदार कुलदीपसिंह सेंगरवर बलात्काराचा आरोप आहे. पीडितेच्या वडिलांचा पोलिस कस्टडीत संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आमदाराचा भाऊ अतुल सेंगर याला अटक करण्यात आली आहे. तथापि, सेंगर भाजप प्रवेशाआधी सपा आणि बसपामध्ये होते.

 

12वी पास आहे कुलदीप, 2002 मध्ये सुरू झाले होते पॉलिटिकल करिअर
- कुलदीप सिंह यांनी उन्नावच्या राजा शंकर सहाय इंटरकॉलेजमधून 1982 मध्ये 12वी उत्तीर्ण केली होती. यापुढे त्यांनी शिक्षण घेतले नाही.
- शेतीशी संबंधित असलेल्या कुलदीप यांचे राजकीय करिअर 2002 मध्ये सुरू झाले होते, जेव्हा मायावतींच्या बसपाने त्यांना उन्नाव मतदारसंघातून तिकीट दिले होते.
- बसपाच्या तिकिटावर पहिल्याच निवडणुकीत ते आमदार बनले, यानंतर त्यांनी 2007 मध्ये समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली आणि उन्नावच्या बंगरमऊमधून आमदार म्हणून निवडून आले.
- 2012 मध्ये सपाने त्यांना उन्नावच्या भगवंतनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते तेथूनही विजयी झाले.
- 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना बंगरमऊ मतदारसंघातून उमेदवारीदिली. आणि या वेळीही ते आमदार बनले.

 

70 लाखांची घरे, 17 लाखांची SUV
- 2017 च्या निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात कुलदीप यांनी तब्बल 3 कोटींची संपत्ती घोषित केली.
- त्यांच्या कार कलेक्शनमध्ये 17.6 लाखांची फॉर्च्यूनर आणि 9.33 लाखांची टोयोटा इनोव्हा आहे.
- पत्नी संगीता सिंह सेंगर यांच्याकडे 12 लाखांहून जास्त रकमेचे दागिने आहेत.
- त्यांचे उन्नावमध्ये 1 कोटी किमतीचे शेत आहे. गाझियाबादच्या इंदिरानगरात त्यांनी 30 लाखांचा प्लॉटही खरेदी केलेला आहे.
- त्यांचे उन्नाच्या सिव्हिल लाइन्समध्ये घर आहे. याशिवाय लखनऊमध्ये दोन फ्लॅट आहेत. एक गोमतीनगर आणि दुसरे इंदिरानगरमध्ये आहे.
- या तिन्ही घरांची किंमत 70 लाख रुपये आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...