आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड: गृहमंत्र्याच्या पुतण्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा, लग्नाचे आमिष दाखवून 4 वर्षे लैंगिक शोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबिकापूर (छत्तीसगड) - राज्याचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांचा पुतण्या शमोधवर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेची आरोपीशी 4 वर्षांपूर्वी शाळेत शिकत असताना भेट झाली होती. लग्नाचे वचन देऊन तो तरुणीचे लैंगिक शोषण करत राहिला. 

 

शिक्षणादरम्यान झाली भेट... घेतला गैरफायदा
- वर्षभरापूर्वी आरोपीला एसईसीएलमध्ये नोकरी लागल्यावर त्याने पीडितेला लग्नाला नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल न करता दोघांमध्ये समझौता घडवून आणला. दरम्यान, आरोपीने दुसऱ्या तरुणीशी लग्नही केले.
- हे प्रकरण आता तापत असल्याचे पाहून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही.

- पोलिसांनी सांगितले की, 4 वर्षांपूर्वी सूरजपूर जिल्ह्यातील चेंद्राचा रहिवासी आरोपी शमोध पैकरा यांची पीडितेशी भेट झाली होती. आरोपीने लग्नाचे वचन देऊन तिचा गैरफायदा घेतला. या काळात त्याने तिच्याशी आमिष दाखवून लैंगिक संबंध प्रस्थापित केले.
- पीडितेने लग्नाचा विषय काढताच तो टाळायला लागला. म्हणायचा की, तू जेव्हा सज्ञान होशील तेव्हा लग्न करीन. दरम्यान, ती एकदा गर्भवतीही झाली होती. आरोपीने गर्भपातासाठी दबाव टाकला, परंतु तिने स्पष्ट नकार दिला.
- पीडितेने एका मुलीला जन्म दिला. एवढे झाल्यावरही आरोपी तिचे लैंगिक शोषण करत राहिला. वर्षभरापूर्वी त्याला एसईसीएलमध्ये अनुकंपेवर नोकरी लागली, यानंतर त्याने लग्नाला नकार दिला.

 

पीडितेने अनेक महिने पोलिसांत मारल्या चकरा
- आरोपीने दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. परंतु पोलिसांनी यापूर्वी झालेल्या समझौत्याचे कारण देत गुन्हा दाखल करायला नकार दिला होता.
- पीडिता आणि तिच्या कुटुंबीय कारवाईसाठी अनेक ठिकाणी विनवणी करत राहिले, परंतु कुणीही त्यांना मदत केली नाही. 3 दिवसांपूर्वीच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता पीडिताही सज्ञान झाली आहे.

 

काय म्हणतात पोलिस?
- एसपी म्हणाले, काही दिवसांपूर्वीच याची तक्रार माझ्याकडे आली होती, आता कारवाई करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटकही केली जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...