आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक: 8 वर्षांच्या चिमुरडीचे 40 वर्षांच्या नराधमाने केले अपहरण; गळा दाबून हत्या, मृतदेहासोबत बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालोदतरा (जयपूर) - राजस्थानच्या ऊनरोड गावात पाशवी बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 9 दिवसांतच चार्जशीट सादर केली आहे. बाडमेर जिल्ह्यातील हे पहिले प्रकरण आहे. जेव्हा इतक्या कमी वेळात चार्जशीट दाखल झाली आहे. पोलिसांनी तयार केलेल्या 146 पेजेसच्या चार्जशीटमध्ये 39 साक्षीदार असून आरोपीविरुद्ध पोक्सो अॅक्टसहित 11 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांनुसार शिक्षा झाल्यास 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची किंवा जन्मठेपेची (नैसर्गिक मृत्यूपर्यंत) किंवा फाशीची तरतूद आहे.

 

आरोपीचे वय 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.  पोलिसांनी चार्जशीटशी संबंधित सर्व दस्तऐवज न्यायालयात सादर केले. याप्रकरणाची सुनावणी 5 जुलै रोजी होईल. या घटनेमुळे राज्यभरात आरोपीविरुद्ध संताप व्यक्त होत असून जिल्ह्यात मोठे आंदोलन होत आहे.

 

आजोबाच्या घरात झोपली होती चिमुरडी, आरोपीने नेले उचलून
ही 22 जून रोजीची घटना आहे. ऊनरोड गावात आपल्या आजोबाच्या घरात एकटीच झोपलेल्या 8 वर्षीय चिमुरडीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि मग तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार करून तो फेकून देण्यात आला.  पोलिसांनी घटनेनंतर लगेचच आरोपी रईश ऊर्फ रसीद ऊर्फ रोशन ऊर्फ रसूल धोधे खां याला अटक केली होती. 3 दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला होता. यानंतर कोर्टात हजर केल्यावर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.  तुरुंगात पाठवण्यात आले.

 

39 साक्षीदारांचे जबाब
पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या चार्जशीटमध्ये 39 साक्षीदारांचे जबाब आहेत. यात 22 जूनच्या रात्री काय झाले, कसे झाले, हा सर्व तपशील आहे. पोलिस ऑफिसर, जवानांपासून ते डॉक्टरांसहित 27 सरकारी साक्षीदार आणि 12 साक्षीदार पीड़ितेचे कुटुंबीय तसेच प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. पोलिसांच्या मते, त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले आहेत.

 

पोस्टमार्टम रिपोर्ट
पोलिसांना डीएनए व एफएसएल रिपोर्ट मिळालेली नाही. तथापि, चार्जशीटमध्ये पोस्टमार्टम रिपोर्ट संलग्न आहे. यानुसार आरोपीने चिमुरडीचे अपहरण, बलात्कारानंतर हत्या आणि मग पुन्हा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात चिमुरडीच्या शरीरावर व प्रायव्हेट पार्टवरही गंभीर दुखापतीचा उल्लेख आहे.   

बातम्या आणखी आहेत...