आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक : वरुण गांधी, प्रमोद मुतालिकला मारणार होता दाऊदचा हा Sharp Shooter

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहीमचा शार्प शूटर राशीद मालबारी भाजप नेते वरुण गांधी आणि श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांची हत्या करणार होता. पण पोलिसांनी मालबारीला अबूधाबी येथे अटक केल्याने हत्येचा कट उधळून लावला. छोटा शकील याने मालबारीला या दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर येतेय. 


राशीद मालबारी हा 2014 मध्ये मंगळुरू कोर्टातून जामीन मिळवून नेपाळमार्गे भारतातून फरार झाला होता. तो छोटा शकीलचा खास असल्याचे सांगितले जाते. अंडरवर्ल्डचे नेपाळमधील सर्व काम मालबारीच पाहतो असे सांगितले जाते. बँकॉकमध्ये 2000 साली छोटा राजनवर झालेल्या हल्ल्यात राशीद मालबारीचाही समावेश होता. मंगळुरू कोर्टाचा बेल जंप करून पळाल्यानंतर पोलिसांनी मालबारीच्या विरोधात लूकआऊट नोटिस जारी केली होती. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिसही जारी करण्यात आली आहे. 


मालबारी याला छोटा शकीलने प्रमोद मुतालिक आणि वरुण गांधी यांच्या हत्येची सुपारी दिली होती अशा माहिती त्याच्याकडून मिळाल्याचे समजतेय. या हत्येसाठी मालबारीने कटही रचला होता, पण तो कट उधळून लावत पोलिसांनी मालबारीला अटक केली. 

 

बातम्या आणखी आहेत...