आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2जीचा निर्णय योग्य तर मक्का मशीद स्फोटाचा चूक कसा, काँग्रेसला भाजपचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मक्का मशीद ब्लास्ट प्रकरणी असिमानंदसह 5 आरोपींची मुक्तता झाल्याने कांग्रेसने म्हटले आहे की, सरकारने निर्णयावर विचार करायला हवा. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, तपास संस्थांवरील विश्वास उडाला आहे. दुसरीकडे भाजपने म्हटले आहे की, टुजी संदर्भात निर्णय आला तेव्हा भाजप हा निर्णय योग्य असल्याचे म्हणत होते. मात्र आता मक्का मशीद प्रकरणाचा निर्णय त्यांना चूक वाटतोय. काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल यांच्याकडून हिंदु धर्माला बदनाम करण्याचे प्रशिक्षण घेतात. ते म्हणाले की, राहुल यांनी हिंदुंचा अपमान केल्या प्रकरणी माफी मागावी. यापूर्वी एमआयएमचे औवैसी यांनीही या प्रकरणात न्याय झाला नसल्याचे म्हटले होते. 


कोण काय म्हणाले.. 
भाजप

संबित पात्रा म्हणाले, आम्ही न्यायाच्या निर्णयावर भाष्य करत नाही. टुजीचा निकाल आला तेव्हा काँग्रेस कोर्ट योग्य आहे म्हणत होते. आता कोर्ट चूक आहे असे म्हणत आहे. राहुल गांधी आजही माफी मागण्यासाठी 12 वाजता इंडिया गेटवर जातील का? पी चिदंबरम आणि सुशील कुमार शिंदे यांनी धर्म बदनाम करण्याचे प्रशिक्षण सोनिया आणि राहुल गांधींकडून घेतले आहे. राहुल गांधींनीतर अमेरिकेच्या राजदुतांना म्हटले होते की, आम्हाला सिमीची नाही, हिंदुत्ववागदी संघटनांची भिती आहे. खुर्शीद बाटला हाऊसच्या दहशतवाद्यांना शहीद म्हणत होते. 

 

काँग्रेस
गुलाम नबी आझाद म्हणाले-एएनआय भाजप सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे. तपाससंस्थांवरील विश्वास उडाला आहे. तर अशोक गहलोत म्हणाले की - केंद्राने या निर्णयावर विचार करावा आणि पुन्हा अपील करतका येईल का हे पाहावे. प्रकरण न्याय व्यवस्थेशी संबंधित असल्याने मी काहीही बोलणार नाही. 

 

एआयएमआयएम
असदुद्दीन ओवैसी म्हणाले-या प्रकरणात न्याय झालेला नाही. एनआयए आणि नरेंद्र मोदी यांनी आरोपींना जामीन मिळण्याच्या विरोधातही 90 दिवसांत अपील केले नाही. तपास एकांगी होता. त्यामुळे दहशतवादाविरोधी लढा कमकुवत झाला आहे. या स्फोटात 9 जण ठार झाले होते. एनआयए म्हणजे आंधळा आणि बहिरा पोपट आहे. 

 

आरवीएस मणि 
गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आरवीएस मणि म्हणाले-मला हा निर्णय अपेक्षित होता. सर्व पुरावे खोटे होते. या प्रकरणात हिंदु दहशतवादासारखा काही अँगलच नव्हता. ज्यांची प्रतिमा याच खराब झाली त्याची भरपाई कशी करणार. 

 

मो. इरफान
इरफान यांनी मक्का मशिदीतील दुसरा बॉम्ब पाहिला होता. ते म्हणाले, न्यायात उशीर झाला आणि न्याय झालाही नाही. निर्दोष लोक मारले गेले. त्यांना न्याय मिळालाच नाही. अजूनही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. खरे गुन्हेगार पकडले जातील अशी आम्हाला आशा आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...