आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी रोखले तर ऑफिसरचा बॅच अन् गाडी नंबर लिहून घ्या, वाचा काय करावे काय टाळावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - पोलिसांनी अचानक रोखल्यावर लोक घाबरतात. पोलिस चेकिंगदरम्यान नेहमी लोक त्रासापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. परंतु, पोलिस तर आपल्या सुरक्षेसाठीच आहेत, यामुळे पोलिसांची निष्कारण भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. पोलिस अधिकाऱ्याशी अचानक भेट झाल्यास काही गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्ही कायम स्मरणात ठेवल्या पाहिजेत. या बाबी तुम्ही पाळल्या तर तुमच्या मनातील पोलिसांची भीती नष्ट होईल. आज आम्ही अशा काही कॉमन बाबी सांगत आहोत... ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत.

 

तुमच्या वागण्यावरूनच पोलिसांना मिळते अटकेची संधी..
पोलिसांना तुम्ही काय सांगत आहात, हे खूप महत्त्वाचे ठरते. तुम्ही जे काही बोलता, तेच तुमच्याविरुद्ध वापरून पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. जेव्हा तुम्ही पोलिसांशी खूप हुज्जत घालता, तेव्हाच असे नेहमी होते. तुमचे वाहन जर कधी पोलिसांनी रोखले तर सर्वात आधी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन दाखवा. यानंतर पोलिस तुमचे नाव विचारू शकतात, अशा वेळी जर तुम्ही काही हुज्जत घातली तर पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. पोलिस जर तुमचे घर, कार तपासत असेल तर त्यांना तपास करण्यास तुम्ही नकार देऊ शकत नाहीत. कारण यामुळे कोर्टात तुमचेच नुकसान होऊ शकते. पोलिस जर असे म्हणत असतील की, त्यांच्याकडे सर्च वॉरंट आहे, तर त्यांना सर्च वॉरंट दाखवायला सांगा.

 

पोलिसांनी रोखले तर ऑफिसरचा बॅच अन् गाडी नंबर लिहून घ्या, पाहा पुढच्या स्लाइड्सवर..

बातम्या आणखी आहेत...