आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीचे अखेरचे होळी सेलिब्रेशन नाही, काही वेगळेच आहे या Photos मागील सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - श्रीदेवीचे काही फोटोज मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. या फोटोंसोबत सांगितले जात आहे की हे श्रीदेवीचे अखेरचे होळी सेलिब्रेशन होते. मात्र या फोटोंचे वास्तव काही वेगळेच होते. हे फोटो श्रीदेवीच्या अखेरच्या होळी सेलिब्रेशनचे नसून सिंदूर खेळाचे आहे. सिंदूर खेळ हा पश्चिम बंगालमधील एक ट्रॅडिशन आहे. पश्चिम बंगालमधील सुवासिनी एकमेकांना सिंदूरने रंगवून हा खेळ खेळतात. 

 

श्रीदेवी केव्हा खेळली होती सिंदूर 
- श्रीदेवीचा जन्म दक्षिण भारतातील तर तिचा विवाह बोनी कपूर यांच्या पंजाबी कुटुंबात झाला. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की सिंदूर खेळाची श्रीदेवीचा संबंध कसा आला? 
- वास्तविक श्रीदेवी सिंदूर खेळात नेहमी सहभागी होत नव्हती. जे फोटो मीडियामध्ये येत आहेत ते श्रीदेवीच्या पहिल्या आणि अखेरच्या सिंदूर खेळाचे आहेत. 
- ऑक्टोबर 2013 मध्ये लखनऊ येथील सहारा सिटीमध्ये दुर्गा पूजाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पती बोनी कपूरही श्रीदेवीसोबत होते. 
- या सोहळ्यात श्रीदेवीने पारंपरिक बंगाली साडी नेसलेली होती. पांढऱ्या साडीत ती दुर्गा पुजेसाठी आली आणि सुहासिनींसोबत सिंदूर खेळली होती. 
- श्रीदेवीने तेव्हाच स्पष्ट केले होते की तिच्या आयुष्यातील सिंदूर खेळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. 
- यावेळी श्रीदेवीने पाठीवर बोनीचे नाव लिहिले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सिंदूर खेळाचे काही निवडक फोटोज्... 

बातम्या आणखी आहेत...