आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात 2 टक्के मतावरून सत्तेपर्यंत पोहोचले भाजप, ही आहेत यशामागची कारणे..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ईशान्येकडील तीन राज्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. भाजपने त्रिपुरामधअये डाव्यांना चांगलीच टक्कर दिली आहे. याठिकाणचे समोर येत असलेले निकाल पाहता भाजपला या राज्यात सत्ता मिळवण्यात यश येईल अशी शक्यता दिलत आहे. त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून डाव्यांची सत्ता होती. पण यावेळी भाजप डाव्यांकडून सत्ता हिसकावून घेणार अशी परिस्थिती दिसत आहे. 59 जागांसाठी मतदान झालेल्या त्रिपुरामध्ये सध्या हाती येत असलेल्या निकालांनुसार भाजपची सरशी आहे. निकाल असेच राहिले तर भाजप बहुमताचा आकडा मिळवण्याचीही शक्यता आहे. 


भाजपच्या त्रिपुरामधील या यशामागे अनेक कारणे आहे. पक्षाने केलेली निवडणुकीची जय्यत तयारी आणि केंद्र सरकारच्या ईशान्येकडील राज्यांना महत्त्व देण्याच्या भूमिकेला यश आल्याचे त्रिपुराच्या निवडणुकीत दिसून आले. अशीच अनेक कारणे त्रिपुरातील या यशामागे आहेत. याचाच आढावा या पॅकेजद्वारे आपण घेणार आहोत. 

 

ही आहेत कारणे... 
>> प्रचारामध्ये त्रिपुरावर भाजपने चांगलेच लक्ष केंद्रीत केले होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी चार प्रचार सभा घेतल्या होत्या. अमित शहांनी देखिल त्रिपुरावर विशेष लक्ष दिले होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनीही येथे सभा घेतल्या. 2014 मध्ये केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकराने ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष दिले. त्याचा फायदा प्रचारात घेतला. भाजपने माणिक सरकार विरुद्ध मोदी सरकार असाच प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, त्रिपुरातील भाजपच्या याशाची इतर कारणे..

 

बातम्या आणखी आहेत...