आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलायन्स JIOमध्ये जम्बो नोकर भरती, 80,000 जागा भरण्यासाठी सोशल मीडियाची घेणार मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील 6000 संस्था आणि कॉलेजसोबत जिओची पार्टनरशिप आहे. - Divya Marathi
देशातील 6000 संस्था आणि कॉलेजसोबत जिओची पार्टनरशिप आहे.

हैदराबाद - रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी या वर्षी 80,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. भरती प्रक्रिया ही रेफरन्स आणि कँपस प्लेसमेंटच्या माध्यमातून होणार आहे. देशभरात रिलायन्स जिओचा कारभार वेगाने वाढत आहे. जिओ ग्राहकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात भरतीचा निर्णय घेतला आहे. जिओ मागील दोन तिमाहीपासून सलग नफ्यात आहे आणि स्वस्त सेवा देऊन सातत्याने व्यवसाय वृद्धीवर फोकस करत आहे. स्वस्त डेटा प्लॅन आणि मोफत व्हाइस कॉलिंगसोबत कंपनी आता मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणार आहे. 

 

पर्मनंट कर्मचाऱ्यांची संख्या पोहोचणार 2.37 लाखांवर 
- जिओचे एचआर डिपार्टमेंट हेड संजय जोग यांनी सांगितले, 'संध्या कंपनीमध्ये ऑन रोल कर्मचाऱ्यांची संख्या 1.57 लाख आहे. नव्याने 75,000 ते 80,000 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.'
- जोग यांनी सांगितले, की कंपनीचा मागील आर्थिक वर्षात एट्रिशन रेट 32% राहिला आहे. यात सेल्स आणि टेक्निकल सेक्शनचा समावेश आहे. दुसरीकडे हेडक्वॉर्टर पातळीवर हा रेट फक्त 2% आहे, तो सरासरी 18% कमी होण्याची शक्यता आहे. 

 

काय असतो एट्रिशन रेट? 
- एट्रिशन रेटचा अर्थ कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या असते. जेवढे जास्त कर्मचारी नोकरी सोडून जातात त्या कंपनीचा एट्रिशन रेट तेवढाच जास्त असतो. 

 

जिओची प्लेसमेंटसाठी 6000 संस्थांसोबत पार्टनरशिप 
- तंत्रज्ञान महाविद्यालयांसह देशभरातील 6000 कॉलेजांसोबत जिओची पार्टनरशिप आहे. या संस्थांमध्ये कंपनीच्या गरजेनुसार अनेक कोर्सेस शिकवले जातात. हे कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रिलायन्स जिओमध्ये रिक्रूटमेंटसाठी तयार केले जाते. 
- त्यासोबतच नोकर भरतीसाठी रेफरेंस आणि सोशल मीडियाची मदत घेतली जाणार आहे. रेफरेंसच्या माध्यामातून 60-70% जागा भरल्या जाणार आहे. नोकर भरतीमध्ये कॉलेज आणि कंपनीमधील सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या रेफरेंसचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. 


जिओ नफ्या 1.2% वाढ 
- जिओ रिलायन्स इंडस्ट्रिजची टेलिकॉम कंपनी आहे. ती सध्या या इंडस्ट्रीतील इतर कंपन्यांना तगडे आव्हान देत आहे. शुक्रवारी रियायन्स इंडस्ट्रिजसोबत जिओचेही आकडे सादर करण्यात आले. चौथ्या तिमाहीमध्ये जिओचा नफ्यात वाढ होऊन तो 510 कोटी झाला आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये तो 504 कोटी रुपये होता. ऑक्टोबर - डिसेंबर या तिमाहीमध्ये जिओ प्रथमच नफ्यात होते. आता सलग दुसऱ्या तिमाहीतही जिओ नफ्यात आहे. 31 मार्चपर्यंत कंपनीच्या ग्राहकांची संख्या 19 कोटींपर्यंत पोहचेल अशी शक्यता आहे. 
- जानेवारी ते मार्च दरम्यान जिओ मोबाइल ग्राहकांनी 506 कोटी जीबी डेटा यूज केला आहे. तर 37,218 कोटी मिनीट फोनवर बातचीत केली. 

बातम्या आणखी आहेत...