आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरातून ‘लालभाई’ सरकारची हकालपट्टी करा : अमित शहा; भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचा रोड-शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहनपूर- त्रिपुरातील लालभाई सरकारची सत्तेवरून हकालपट्टी करण्यात यावी. डावे सरकार जनतेची लूट करत अाहे. त्यामुळे भाजपला सरकार चालवण्याची संधी मिळावी, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. रविवारी शहा यांनी त्रिपुरात रोड शो केला.


त्रिपुरात गेल्या २५ वर्षांपासून डावे पक्षाचे सरकार आहे. परंतु या सरकारने जनतेला लूटण्याचेच काम केले आहे. आता सत्तांतर करण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी यांचा नामोल्लेख न करता शहा यांनी टीका केली. मते खाण्याचे काम काही लोकांनी केल्याने माकपला फायदा करून दिला. त्यामुळेच माकपचे माणिक सरकार मुख्यमंत्री पदी आल्याचे ते म्हणाले.  


केंद्राचा २५ हजार कोटींचा निधी
केंद्र सरकारने त्रिपुराला २५ हजार ३९६ कोटी रुपयांचा निधी दिला होता. १४ व्या वित्त आयोगात त्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या अगोदर तेराव्या वित्त आयोगात ७ हजार २८३ कोटी रुपयांची तरतूद होती. मग १८ हजार कोटी रुपये गेले कुठे ? हे पैसे कम्युनिस्टांच्या खिशात गेले का ? या पैशांचा हिशेब त्रिपुरा सरकारने द्यावा, असे शहा यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...