आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार: RJD नेत्याची अपहरणानंतर हत्या; ओळख पटू नये म्हणून आरोपींनी नेले शिर कापून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवादा -  बिहारच्या नवादामध्ये राजदचे जिल्हा महासचिव कैलाश पासवान यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. कैलाश पासवान यांचा शिर कापलेला मृतदेह नालंदा जिल्ह्याच्या खुदागंज परिसरातील एका पुलाखाली आढळला. कुटुंबीयांनी सांगितले की, 6 जुलै रोजी नारदीगंजच्या बुछी गावातील छोटू गुप्ता राजद नेता कैलाश पासवान यांना कार्यक्रमासाठी बोलेरोतून घेऊन गेला होता. यानंतर ते घरी परतलेच नाहीत.

 

याबाबत नवादा जिल्ह्याच्या शहर पोलिसांत मृत कैलाश यांचा मुलगा संजयने छोटू गुप्ताविरुद्ध अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा नालंदा सरकारी रुग्णालयात गेलेल्या मुलासहित इतर नातेवाइकांनी सांगितले की, आरोपींनी राजद नेत्याची गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी मुंडके गायब केले, बाकीचे शरीर तेथेच सोडून ते फरार झाले.

 

नालंदा पोलिसांनुसार, 7 जुलै रोजी एक मुंडके नसलेला मृतदेह माढ़ीलाल गावाच्या जवळ आढळला होता. यानंतर मृतदेह सरकारी रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला होता. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

 

 

बातम्या आणखी आहेत...