आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुमका - परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जीप आणि भरधाव ट्रकमध्ये समोरा-समोर धडकेत 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला आहे. झारखंडच्या दुमका येथे रविवारी हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता, की मृतदहे आणि जखमींना जेसीबीने बाहेर काढावे लागले आहे. जीपमध्ये एकूण 9 जण प्रवास करत होते. त्यापैकी 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या एका विद्यार्थ्याने उपाचारासाठी नेले जात असताना अखेरचा श्वास घेतला. मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तसेच एका गंभीर जखमीवर दुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परीक्षेला जात होते विद्यार्थी
- मृत्यूमुखी पडलेले सगळेच विद्यार्थी दुमका येथील रहिवासी आहेत. ते सर्व रविवारी देवघर येथे पंचायत सचिव पदाच्या परीक्षेला जात होते. मात्र, रस्त्यातच ही दुर्घटना घडली.
- जीपमध्ये चालकासह 9 जण प्रवास करत होते. परीक्षा केंद्राच्या दिशेने जाणाऱ्या जीपला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात जीपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
मृतांची नावे
- सुष्मिता दत्ता, न्यू बाबू पाडा, दुमका
- सौरव दत्ता, न्यू बाबू पाडा, दुमका
- संतोष गुप्ता, रासिकपूर, दुमका
- अंबिका प्रसाद तुरी (ड्राइव्हर), नागडीह, रासिकपूर, दुमका
- पुरुषोत्तम मांझी, कुमार पाडा, दुमका
- नवीन गोराई, रासिकपूर, दुमका
- स्वास्तिक कुमार, रासिकपूर, दुमका
- देवेन्द्र गुप्ता, रासिकपूर, दुमका
पुढील स्लाइड्सवर, घटनास्थळ आणि अपघातग्रस्तांचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.