आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतापगड - फतनपूर परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या ट्रक आणि जीप अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना प्रतापगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जीपमध्ये एकूण 14 जण प्रवास करत होते, असे सांगितले जात आहे. हे सर्व प्रतापगड-अमेठी मार्गावरील चंदिकन धामहून दर्शन करून परतत होते.
मुख्यमंत्र्यांची नुकसान भरपाईची घोषणा
- एसडीएम सदर पंकज वर्मा यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून 2-2 लाखांची मदत आणि जखमींना प्रत्येकी 50-50 हजार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
बस-डंपर अपघातात 5 ठार
दुसरीकडे, लखनऊ-फैजाबाद हायवेवर शुक्रवारी सकाळी बस आणि डंपरची धडक झाली. त्यात दोन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. सात जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जण गंभीर आहेत. जखमींना बाराबंकीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना लखनऊला पाठवण्यात आले आहे. पाच मृत बिहारचे राहणारे होते. ही बस आनंद विहारहून दिल्ली ते बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये जात होती. हा अपघात लखनऊपासून सुमारेल 25 किलोमीटर अंतरावर सफेदाबादजवळ झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.