आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात घुसून धारदार शस्त्राने वार, लाखोंची लूट; अमृतसर येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- पंजाबमधील अमृतसर येथील बटाला रोडवर पोलिस ठाण्याशेजारी असलेेल्या मनी ट्रान्सफरचे काम करणाऱ्या तरुणास गंभीर जखमी करून चार गुंडांनी लाखो रुपये लुटून नेले. शेजारी असलेल्या दुकानावरील सीसीटीव्हीमध्ये दोन गुंडांचे चेहरे दिसतात. भाटिया फाॅरेक्स नावाने मनी ट्रान्सफरचे काम करणाऱ्या विनोद भाटिया यांनी सांगितले. 


सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक चार गुंड त्यांच्या कार्यालयात शिरले. त्यांनी दरवाजा लावला. आत येताच धारदार शस्त्राने वार केले. जवळच पडलेल्या टेप रोलने त्यांचे हातपाय बांधून टाकले. त्यानंतर पिस्तूल दाखवून त्यांच्याकडून कपाटाची चावी घेतली. त्यांना केबिनमध्ये बंद करून फरार झाले. त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. गुंडांनी पाच लाख रुपये रोख, दोन मोबाइल फोन, ५०० ऑस्ट्रेलियन आणि काही अमेरिकी डॉलर लुटून नेले. या चोरीत गँगस्टर सारज मिंटू आणि शुभम यांचा हात असण्याची शक्यता भाटिया यांनी बोलून दाखवली. 

बातम्या आणखी आहेत...