आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊमध्ये मध्यरात्रीनंतर दरोडा, 3 जणांवर गोळीबार, 2 अल्पवयीन मुलींना नेले उचलून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - येथील चिनहट भागात गुरुवारी रात्री 12.30 वाजता एका घरात दरोडेखोर घुसले. कुटुंबियांनी विरोध केला तर तीन जणांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. लूटमार केल्यानंतर दरोडेखोरांनी घरातील दोन अल्पवयीन मुलींनाही पळवून नेले. या घटनेची माहिती दिल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस जवळपास दीड तासांनी घटनास्थळी दाखल झाले. पळवून नेण्यात आलेल्या दोन्ही मुली सापडल्या असून त्यांच्यावर बलात्कार झाला की नाही याबद्दल पोलिस आणि कुटुंबियांनी काहीही सांगितलेले नाही. 


जखमींवर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार 
- दरोडेखोरांनी तिघांवर गोळीबार केला, ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 
- चिनहट येथील दीनानाथ यांच्या घरावर गुरुवारी रात्री दरोडा पडला. रात्री साधारण 12.30 वाजता 6-7 दरोडेखोर घरात घुसले आणि त्यांनी कुटुंबातील सर्वांना ओलिस ठेवून घरात धुडगूस घातला.
- घरात सोने, रोख रक्कम कुठे आहे हे सांगितले नाही तेव्हा दरोडेखोरांनी दीनानाथ, त्यांची पत्नी आणि सूनेवर गोळीबार केला. लुटमार करुन कुटुंबातील दोन मुलींना आपल्यासोबत घेऊन पळून गेले. 


एका तासाने सापडल्या मुली...
- दीनानाथ यांच्या घरापासून जवळपास 300 मीटर अंतरावर दरोडेखोरांनी दोन्ही बहिणींना सोडून पोबारा केला. उशिरा आलेल्या पोलिसांनी मुलींना शोधले आणि कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे. 
- दरोडेखोरांनी दोन्ही मुलींवर बलात्कार केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.