आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटोमॅक स्कॅम: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कंपनीचे 11 अकाऊंट केले सील, कुटुंबीयांचे मोबाइल जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारीचे कानपूर येथील घर. दोन दिवसांपासून सीबीआय येथे चौकशी करत आहे. - Divya Marathi
रोटोमॅक कंपनीचे मालक विक्रम कोठारीचे कानपूर येथील घर. दोन दिवसांपासून सीबीआय येथे चौकशी करत आहे.

कानपूर (उत्तरप्रदेश) - रोटोमॅक पेन कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांच्या घरावर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयने छापा टाकला. असेही म्हटले जात आहे की कोठारीला अटक होऊ शकते. दरम्यान, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कंपनीचे 11 बँक अकाऊंट्स सील केले आहेत. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही कोठारीसह तिघांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. कोठारीने 7 बँकांचे 3695 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही.. कोठारी, त्याची पत्नी साधना आणि मुलगा राहुल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला विक्रम कोठारीने बँकेचे 800 कोटी रुपये बुडवल्याची माहिती होती, आता हे प्रकरण 3695 कोटींचे असल्याचे उघड झाले आहे. 

 

काय आहे प्रकरण 
- सीबीआयने सांगितले, की रोटोमॅक पेनचे प्रवर्तक विक्रम कोठारीने फक्त बँक ऑफ बडोदाची फसवणूक केली नाही तर 7 बँकांना गंडा घातला आहे. 
- त्याने बँकांना धोका देत त्यांच्याकडून 2919.29 कोटी रुपये कर्ज घेतले. व्याजासह ही रक्कम आता 3695 कोटींवर गेली आहे. 

 

कोणत्या बँकेचे किती कर्ज 

बँक ऑफ बडोदा 456.53 कोटी  रुपये
बँक ऑफ इंडिया 754.77 कोटी  रुपये
बँक ऑफ महाराष्ट्र 49.82 कोटी  रुपये 
अलाहाबाद बँक 330.68 कोटी  रुपये
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 97.47 कोटी  रुपये
इंडियन ओवरसीज बँक  771.07 कोटी  रुपये
यूनियन बँक ऑफ इंडिया 458.95 कोटी  रुपये 

 

असे उघड झाले गौडबंगाल 
- विक्रम कोठारीविरोधात 600 कोटींचा चेक बाऊंस झाल्याची तक्रार झाली होती. या प्रकरणी आरबीआयने अलहाबाद बँकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरुन सीबीआयने कोठारीविरोधात गुन्हा दाखल केला. 
- त्यानंतर समोवारी सीबीआय आणि ईडीने संयुक्तरित्या कोठारीच्या कानपूर येथील निवासस्थानी छापा टाकला.  

 

कोणावर गुन्हा दाखल 
- या केसमध्ये रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर विक्रम कोठारी, पत्नी साधना कोठारी आणि मुलगा राहुल कोठारी यांची एफआयआरमध्ये नावे आहेत. 
- सीबीआयच्या एफआयआरच्या आधारी ईडीने मनी लाँड्रिंगची केसही दाखल केली आहे. 

 

कोण आहे विक्रम कोठारी?
- विक्रम कोठारी हा प्रसिद्ध उद्योगपती एमएम कोठारी (मनसुख लाल महादेव भाई कोठारी) यांचा मुलगा आहे. 
- एम.एम. कोठारी यांचा जन्म कानपूरमधील निराली या गावात झाला होता. 8 भावा-बहिणीत ते सर्वात मोठे होते. 
- खासगी नोकरीने एम.एम. कोठारींनी करिअरला सुरुवात केली होती. हळुहळु त्यांनी शाळा-महाविद्यालयासह अनेक संस्था सुरु केल्या. पान पराग आणि रोटोमॅक पेन यांची त्यांनी निर्मिती सुरु केली होती. 
- एम.एम.कोठारी यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले विक्रम आणि दीपक यांनी उद्योग हातात घेतला. पान पराग उद्योग दीपक यांच्या वाट्याला गेला तर रोटोमॅक पेन उद्योग विक्रम यांच्याकडे आला. 

बातम्या आणखी आहेत...